मालेगाव परिसरात दहा रुपयांचे नाणे बाद झाल्याची अफवा
By admin | Published: April 7, 2017 12:56 AM2017-04-07T00:56:01+5:302017-04-07T00:56:10+5:30
संगमेश्वर : दहा रुपयांचे नाणे बाद झाले असल्याची अफवा पसरल्याने ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर ही नाणी शहरी भागात चलनात येत आहेत.
संगमेश्वर : दहा रुपयांचे नाणे बाद झाले असल्याची अफवा पसरल्याने ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर ही नाणी शहरी भागात चलनात येत आहेत. ही नाणी सांभाळताना स्थानिक दुकानदारांची चांगलीच दमछाक होत आहे.
८ नोव्हेंबर २०१६ पासून भारत सरकारने पाचशे व हजाराच्या नोटा बंद केल्यानंतर १० रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणावर चलनात येत आहेत. शहरातील छोटे-मोठे दुकानदार ग्राहकांकडून ही नाणी नाइलाजाने घेत आहेत. सर्व व्यापाऱ्यांची नाणी हाताळताना चांगलीच दमछाक होते आहे. ही नाणी अजूनही चलनात आहेत. त्यावर कुठलीही बंदी आलेली नाही, असे बँकांकडून सांगण्यात आले.
दहा रुपयांच्या नाण्यांमुळे नागरिक, दुकानदार तसेच बँक प्रशासन सर्वच त्रस्त झाले आहेत. विशेषत: ग्रामीण भागात नाणे बंद झाल्याची अफवा पसरल्याने ह्या मंडळींनी शहरात धाव घेत नाणी देऊन विविध वस्तू खरेदीचा सपाटा लावला आहे. चलनात दहा रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणावर आल्याने ती हाताळताना सर्वांचीच चांगलीच दमछाक होत आहे.
बँकांतूनही ग्राहकांना दहा रुपयांची नाणी सक्तीने देण्यात येत आहेत. ग्राहक व बँक कर्मचारी यांच्यात यामुळे वादविवादेचे प्रसंग उद्भवत आहेत. (वार्ताहर)