सोशलमिडीयावर अफवा : गंगापूररोड परिसरात बिबट्याविषयी दहशतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 06:03 PM2019-02-02T18:03:55+5:302019-02-02T18:08:31+5:30

शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अशाच पध्दतीची अफवा कर्णोपकर्णी सोशल्मिडियाच्या माध्यमातून पसरली आणि गंगापूररोडला जोडणा-या पाईपलाईन रोडवरील प्रोफेसर कॉलनी, सिरीन मेडोज, खांदवेनगर या भागात एकच गर्दी लोटली

Rumors on social media: Scary atmosphere of leopard in Gangapur Road area | सोशलमिडीयावर अफवा : गंगापूररोड परिसरात बिबट्याविषयी दहशतीचे वातावरण

सोशलमिडीयावर अफवा : गंगापूररोड परिसरात बिबट्याविषयी दहशतीचे वातावरण

Next
ठळक मुद्देगंगापूररोड, आंनदवल्ली शिवार, पाईपलाइन रोड याभागात गर्दी नागरिकांनी सावधगिरीने व जबाबदारीने वागण्याची गरजपश्चिम वनविभाग, पोलीस नियंत्रण कक्ष याबाबत सतर्क

नाशिक : सावरकरनगरमध्ये आठवडाभरापुर्वी वनविभागानेबिबट्याला यशस्वीपणे पिंजऱ्यात जेरबंद केले. त्यानंतर शहरात विविध भागांमध्ये बिबट्याने दर्शन असे सांगत बिबट्याचे खोटे छायाचित्र इंटरनेटच्या माध्यमातून मिळवत नेटिझन्स्कडून सोशलमिडीयावर पसरविण्यास सुरूवात झाल्याने नागरिकांमध्ये विनाकारण घबराट शनिवारी (दि.२) पसरली. गंगापूररोड, आंनदवल्ली शिवार, पाईपलाइन रोड याभागात नागरिकांनी बिबट्याला बघण्यासाठी एकच गर्दी केली. वनविभागाने या भागात बिबट्याच्या दर्शनाची बातमी खोटी असल्याचे निष्पन्न केले आहे.
सावरकरनगरमध्ये अनावधानाने शिरलेल्या बिबट्यामुळे नाशिककरांची पाचावर धारण बसली आहे. नागरिकांनी सावधगिरीने व जबाबदारीने वागण्याची खरी गरज असली तरीदेखील काही अतीउत्साही नेटिझन्स्कडून सोशलमिडियावर बिबट्याच्या दर्शनाच्या बातम्या नव्हे तर निव्वळ अफवा पसरविल्या जात असल्यामुळे गंगापूररोड परिसरात दहशतीचे वातावरण तयार होत आहे. सोशलमिडियाचा जबाबदारीने वापर करण्याची आवश्यकता असून बेभानपणे अनावश्यक माहिती व छायाचित्रे खात्री न करता पुढे पाठवू नये असे आवाहन मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी केले आहे.
शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अशाच पध्दतीची अफवा कर्णोपकर्णी सोशल्मिडियाच्या माध्यमातून पसरली आणि गंगापूररोडला जोडणा-या पाईपलाईन रोडवरील प्रोफेसर कॉलनी, सिरीन मेडोज, खांदवेनगर या भागात एकच गर्दी लोटली. कोणी म्हणे एका खासगी शाळेच्या आवारात बिबट्या शिरला तर कोणी एकाने अफवा पसरविली की येथील नाल्यातून पळत गेला त्यामुळे बघ्यांची येथे गर्दी झाली होती. याबाबतची माहिती वनविभाग नाशिक पश्चिमला मिळताच वनरक्षक उत्तम पाटील, राजेंद्र ठाकरे, सचिन आहेर यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संपुर्ण परिसर वनकर्मचा-यांनी पिंजून काढत पाऊलखुणा कोठेही आढळून आल्या नाहीत. नाशिक पश्चिम वनविभाग, पोलीस नियंत्रण कक्ष याबाबत सतर्क असून सातत्याने सातपूर वनपरिक्षेत्र, नाशिक वनपरिक्षेत्रात वनकर्मचारी गस्तीवर असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे बिबट्याविषयीच्या अफवा पसरविणे टाळावे, जेणेकरुन जनतेची व प्रशासनाची दिशाभूल टाळण्यास मदत होईल.

Web Title: Rumors on social media: Scary atmosphere of leopard in Gangapur Road area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.