‘त्या’ ग्राहकांकडून पैसे वसूल करण्यासाठी धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 01:07 AM2018-06-20T01:07:12+5:302018-06-20T01:07:12+5:30
सिडको : विजयनगर येथील अॅक्सीस बँकेच्या एटीएम मशीनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने एक हजार रुपये काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना मशीनमधून तब्बल पाच हजार म्हणजे पाच पट रक्कम मिळत असल्याने सोमवारी रात्री पैसे काढºयासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. रात्री उशिरा ही बाब बँकेच्या लक्षात आल्यानंतर एटीएम मशीन बंद करण्यात आले.

विजयनगर येथे अॅक्सीस बँकेचे एटीएम मशीन आहे. या मशीनमध्ये सोमवारी दुपारी रक्कम भरणा करण्यात आली असताना रात्री अचानक या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ग्राहकांना तब्बल पाच पट रक्कम मिळत असल्याने पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. एका ग्राहकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ बँक व्यवस्थापनाच्या ही बाब लक्षात आणून दिली. यानंतर बॅँक व्यवस्थापनाने तत्काळ अंबड पोलिसांशी संपर्क साधून पैसे काढण्यासाठी जमलेली गर्दी हटविली. तोपर्यंत एटीएम मशीनमधून तब्बल दोन लाख ६३ हजार इतकी रक्कम ग्राहकांनी काढल्याचे बॅँकेच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान मंगळवारी एटीएम मशीनची दुरुस्ती करण्यात येत असल्याने दिवसभर एटीएम मशीनमधून पैसे काढणे बंद ठेवण्यात आले होते.
४सोमवारी(दि.१८) बँकेतून काढण्यात आलेली दोन लाख ६३ हजार रुपयांची रक्कम ही किती ग्राहकांनी काढली याची माहिती बँक व्यवस्थापनाकडून घेण्यात येत असून, ज्या ग्राहकांना पाचपट रक्कम मिळाली आहे. अशा ग्राहकांकडून बॅँकेची जादा गेलेली रक्कम कशी परत मिळू शकते यासाठी बॅँकेकडून चाचपणी सुरू असल्याचा समजते.