नाशिकरोड येथे रन मिनी मॅरेथॉन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:38 PM2018-01-21T23:38:59+5:302018-01-22T00:22:22+5:30

नॅक फाउंडेशनच्या वतीने नाशिकरोड येथे रन मिनी मॅरेथॉन स्पर्धा रविवार (दि. २१) रोजी आयोजित करण्यात आली होती. वेगवेगळ्या गटांत घेण्यात आलेल्या या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत नाशिक जिल्ह्यांतील अनेक खेळाडूंनी, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. रन मिनी मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात नाशिकरोड येथील बिटको चौकांतून सकाळी ७ वाजता करण्यात आली होती.

 Run Mini Marathon Tournament at Nashik Road | नाशिकरोड येथे रन मिनी मॅरेथॉन स्पर्धा

नाशिकरोड येथे रन मिनी मॅरेथॉन स्पर्धा

Next

नाशिकरोड : नॅक फाउंडेशनच्या वतीने नाशिकरोड येथे रन मिनी मॅरेथॉन स्पर्धा रविवार (दि. २१) रोजी आयोजित करण्यात आली होती. वेगवेगळ्या गटांत घेण्यात आलेल्या या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत नाशिक जिल्ह्यांतील अनेक खेळाडूंनी, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. रन मिनी मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात नाशिकरोड येथील बिटको चौकांतून सकाळी ७ वाजता करण्यात आली होती. याप्रसंगी तहसीलदार निवडणूक तथा कार्यकारी दंडाधिकारी गणेश राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, आंतरराष्ट्रीय धावपटू पूनम सोनोने, नॅक फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र साळवे, रवि पगारे, राजेश आढाव, शोभा आवारे, शशी आवारे, शिवाजी कदम, मिलिंद बागुल, शैलेजा उघाडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेस सुुरुवात करण्यात आली. मिनी मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटांत रोहिदास भोसले हा विजेता ठरला, तर महिला गटात आरती पाटील ही विजेता ठरली.  नॅक फाउंडेशनच्या वतीने आयोजित दुसºया रन मिनी मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटांमध्ये प्रथम रोहिदास किसन भोसले, द्वितीय दिनकर महाजन, तर तृतीय संताजी महाजन हे विजेते ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल जगताप व विशाल निकम यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी नॅक फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र साळवे, सचिव कलीम शेख, हेमंत सोनवणे, गणेश कुलथे, राज पिल्ल, अमोल जगताप, नंदू पगारे आदी प्रयत्नशील होते.

Web Title:  Run Mini Marathon Tournament at Nashik Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.