रुग्णाच्या नातेवाईकांची धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:13 AM2021-04-12T04:13:00+5:302021-04-12T04:13:00+5:30
मेडिकल दुकानांसमोर लागल्या रांगा नाशिक: शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवेतील फक्त मेडिकल दुकानेच सुरू असल्याने या दुकानांसमोर ग्राहकांच्या रांगा ...
मेडिकल दुकानांसमोर लागल्या रांगा
नाशिक: शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवेतील फक्त मेडिकल दुकानेच सुरू असल्याने या दुकानांसमोर ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. रात्रीदेखील मेडिकल दुकानांसमोर ग्राहक रांगत उभे राहून औषधे तसेच जनरल लागणारे साहित्य खरेदी करीत असल्याचे दिसते. दुकानात गर्दी हेाणार नाही, याची काळजी दुकानदारांकडून घेतली जात आहे.
इंदिरानगर बाजारपेठेत रस्ते सूनसान
नाशिक: इंदिरानगर परिसरातील बाजारपेठांच्या रस्त्यायावर शुकशुकाट पसरला असल्याचे दिसून येते. येथील मुख्य रस्त्यावरील बाजारपेठ तसेच अंतर्गत मार्गावरील दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण बाजारपेठेत शांतता दिसून आली. बाजारातील सर्व प्रकारची दुकाने बंद ठेऊन दुकानदारांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
शहरात घंटागाडीची सेवा सुरळीत
नाशिक: शहरातील उपनगरांमध्ये घंटागाडीची सेवा सुरळीत सुरू असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे नागरिक चिंतेत असून आरेाग्याला अधिक प्राधान्य देत आहेत. अशावेळी दररोज येणाऱ्या घंटागाडीमुळे महिलावर्गाला केरकचरा टाकण्याची सुविधा झाली आहे. घंटागाडीवरील कर्मचारी जीवाची पर्वा न करता नागरिकांना सेवा देत आहेत.
खासगी डॉक्टरांकडे वाढली गर्दी
नाशिक: वाढत्या उन्हामुळे संसर्गजन्य आजारात वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील खासगी डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. डॉक्टर्सदेखील सुरक्षित अंतराबरोबरच सर्व प्रकारची काळजी घेत रुग्णांवर उपचार करीत असून संशयास्पद रुग्णांना कोविड चाचणीचा सल्लाही देत आहेत.
गोळे कॉलनीतील गर्दी कायम
नाशिक: रिटले आणि होलसेल दरात औषधे तसेच सर्जिकल साहित्य मिळणाऱ्या गोळे कॉलनीत ग्राहकांनी गर्दी कायम असल्याचे दिसून येते. गोळे कॉलनीतील सर्वच रस्त्यांवर मेडिकल दुकाने तसेच मेडिकल स्टॉकिस्टची दुकाने असून होलसेलर्सकडे जिल्ह्यातील ग्राहक येतात. सध्याच्या परिस्थितीत आरोग्यविषयक जनजागृती वाढल्याने साहित्य खरेदी करण्यासाठी गोळे कॉलनीत गर्दी होत आहे.