विवरण भरण्यासाठी करदात्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 12:07 AM2017-08-01T00:07:11+5:302017-08-01T00:07:22+5:30

प्राप्तीकर विवरणपत्र (रिटर्न्स) भरण्यासाठी करदात्यांची अखेरच्या दिवशीही सोमवारी (दि.३१) धावाधाव सुरू होती. महिनाभरापासून प्राप्तीकर विभागाकडून आॅनलाइन रिटर्न्स भरून घेतले जात असताना ‘ई-फाइलिंग’ सुविधेमुळे करदात्यांना मोठ्या गर्दीपासून दिलासा मिळाला आहे

Running of taxpayers to fill in details | विवरण भरण्यासाठी करदात्यांची धावपळ

विवरण भरण्यासाठी करदात्यांची धावपळ

Next

नाशिक : प्राप्तीकर विवरणपत्र (रिटर्न्स) भरण्यासाठी करदात्यांची अखेरच्या दिवशीही सोमवारी (दि.३१) धावाधाव सुरू होती. महिनाभरापासून प्राप्तीकर विभागाकडून आॅनलाइन रिटर्न्स भरून घेतले जात असताना ‘ई-फाइलिंग’ सुविधेमुळे करदात्यांना मोठ्या गर्दीपासून दिलासा मिळाला आहे. सुमारे ८० टक्के करदात्यांनी कर सल्लागार अथवा सनदी लेखापालांच्या मदतीनेच रिटर्न्स भरले असून, नोटाबंदीनंतर करदात्यांमध्ये रिटर्न भरण्याविषयी जागरूकता निर्माण झाल्याचे मत आयकर तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. छोटे व्यावसायिक, नोकरदार आणि एक कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या व्यापाºयांनी ३१ जुलैपर्यंत रिटर्न्स भरणे आवश्यक होते. ई-फाइलिंग व प्राप्तीकर विवरणपत्र सादर करण्याविषयी नोटाबंदीच्या काळानंतर सर्वसामान्य करदात्यांमध्ये अधिक जागरूकता निर्माण झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक करदात्यांनी रिटर्न्स भरले. रिटर्न भरण्याची मुदत संपली असली तरी करदाते ३१ मार्चपर्यंत त्यांचे विवरणपत्र सादर करू शकणार आहेत. परंतु, यापुढील काळात करदात्यांना कराच्या रकमेवर दरमहा १ टक्का व्याज दंडात्मक स्वरूपातच मोजावे लागणार असल्याने शासकीय व खासगी क्षेत्रांतील अनेक वेतनधारकांसह छोटे व्यावसायिक आणि एक कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या व्यापाºयांनी ३१ प्राप्तीकर विवरणपत्र भरण्याचा प्रयत्न केल्याने नेहमीच्या तुलनेत मुदत संपण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी करदात्यांनी विवरणपत्र सादरकरण्यासाठी घाई केल्याचे दिसून आले. ई-फाइलिंगमुळे करदात्यांची मोठी समस्या सुटली आहे. रिटर्न्स भरण्याची प्रक्रि या सुलभ झाल्याने करदात्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, आॅनलाइन रिटर्न्स भरणाºयांची संख्या वाढल्याने सर्व्हर डाउन होत असल्याचा अनुभव काही करदात्यांना आला. तसेच मोबाइल क्र मांक आणि ईमेल आयडीच्या बाबतीत करदात्यांना अनेकविध अडचणी आल्याने या दोन्ही बाबींसाठी पर्याय असणे गरजेचे असल्याचे मत करदात्यांनी व्यक्त केली आहे.
करदात्यांना दिलासा
प्राप्तीकर विवरण भरण्याची सोमवारी (दि.३१) अंतिम मुदत असल्याने देशभरातून अनेक करदात्यांनी एकाचवेळी आॅनलाइन प्राप्तीकर विवरण भरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे करदात्यांना सर्व्हर डाउनचा सामना करावा लागल्याने त्यांनी सोशल मीडियातून रोष व्यक्त केला. अनेक करदात्यांना त्यांचे विवरणपत्र दुपारपर्यंत सादर करता आले नाही. त्यामुळे रिटर्न्स भरण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची मागणीने अधिक जोर धरल्याने अखेर प्राप्तीकर विवरणपत्र सादर करण्यासाठी ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली, असून प्रामाणिकपणे आयकर भरणाºया करदात्यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
दंड भरावा लागणार
प्राप्तीकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी मुदत संपली असली तरी जे करदाते रिटर्न्स दाखल करू शकले नाही, त्यांना ३१ मार्चपर्यंत रिटर्न्स दाखल करता येऊ शकतो. त्यासाठी कराच्या रकमेवर अतिरिक्त १ टक्का व्याजही करदात्यांना दंडात्मक स्वरूपात भरावे लागणार आहे. करदात्यांना अशी सवलत चालू आर्थिक वर्षासाठीच लागू असणार आहे. पुढील आर्थिक वर्षापासून मुदत संपल्यानंतर डिसेंबरपर्यंत निर्धारित व्याज व अतिरिक्त पाच हजार रुपये दंड, तर ३१ मार्चपर्यंत व्याजासह दहा हजार रुपये दंडही भरावा लागणार आहे.
- तुषार पगार, सनदी लेखापाल, नाशिक

Web Title: Running of taxpayers to fill in details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.