‘गायत्री मार्केटिंग’च्या विरोधात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:46 AM2017-11-22T00:46:14+5:302017-11-22T00:47:39+5:30

लकी ड्रॉच्या नावे कोट्यवधी रुपये जमा करून गाशा गुंडाळलेल्या ‘गायत्री मार्केटिंग’ कंपनीच्या असंख्य गुंतवणूकदारांनी सोमवारी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आयोजकांविरुद्ध तक्रार दाखल केली असून, पोलिसांंनी गुंतवणूकदारांचे जाबजबाब लिहून घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी फरार आयोजकाशी संपर्क साधला असता, त्याने लवकरच गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले आहे.

Runs against 'Gayatri Marketing' | ‘गायत्री मार्केटिंग’च्या विरोधात धाव

‘गायत्री मार्केटिंग’च्या विरोधात धाव

Next
ठळक मुद्दे लकी ड्रॉच्या नावे कोट्यवधी रुपये जमा पोलीस आयुक्तांना फसवणूक झाल्याचे निवेदनमारहाण करण्याच्या धमक्या 

नाशिक : लकी ड्रॉच्या नावे कोट्यवधी रुपये जमा करून गाशा गुंडाळलेल्या ‘गायत्री मार्केटिंग’ कंपनीच्या असंख्य गुंतवणूकदारांनी सोमवारी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आयोजकांविरुद्ध तक्रार दाखल केली असून, पोलिसांंनी गुंतवणूकदारांचे जाबजबाब लिहून घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी फरार आयोजकाशी संपर्क साधला असता, त्याने लवकरच गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले आहे.  दरमहा साडेचारशे ते सातशे रुपये गोळा करून महिन्यातून एकदा लकी ड्रॉद्वारे सभासदांना दुचाकी वाहन देणाºया या योजनेत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुमारे दहा हजार नागरिकांनी भाग घेतला होता. गेल्या वर्षी सुरू झालेल्या या योजनेच्या पंधरा महिन्यांनंतर जमा होणाºया साडेनऊ हजार रुपयांच्या मोबदल्यात ‘गायत्री मार्केटिंग’ कंपनी प्रत्येक सभासदाला एलएडी दूरदर्शन संच देणार होता.  ही योजना जून महिन्यात संपुष्टात येण्यापूर्वीच आयोजकांनी ठक्कर बजार बसस्थानकानजीक उघडलेले कंपनीचे कार्यालय बंद करून पोबारा केला त्यामुळे हवालदिल झालेल्या शेकडो गुंतवणूकदारांनी आयोजकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु, आज देतो, उद्या देतो, असे आश्वासन देणाºया आयोजकांनी अखेर सभासदांचे फोन उचलणेही बंद केले.  या संदर्भात ‘लोकमत’मध्ये प्रकाश झोत टाकणारी वृत्तमाला प्रसिद्ध झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी एकत्र येत पोलीस आयुक्तांना फसवणूक झाल्याचे निवेदन दिले होते.  आयुक्तांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश सरकारवाडा पोलिसांना दिल्याने सोमवारी असंख्य गुंतवणूकदारांनी सकाळपासूनच सरकारवाडा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला व ‘गायत्री मार्केटिंग’च्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. 
मारहाण करण्याच्या धमक्या 
पोलिसांनी गायत्री मार्केटिंगच्या भरत पाटील या आयोजकांशी संपर्क साधला असता, त्याने आपण बाहेरगावी असल्याचे सांगितले. दूरदर्शन संच देणाºया कंपनीने आमची फसवणूक केल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला असून, लवकरच गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. परंतु गुंतवणूकदारांनी गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरल्यामुळे पोलिसांनी त्यांचे जाबजबाब नोंदवून घेतले आहेत. दरम्यान, काही गुंतवणूकदारांनी आयोजकांशी संपर्क साधला असता, त्यांना मारहाण करण्याच्या धमक्या देण्यात आल्याची तक्रार काही गुंतवणूकदारांनी केली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत आयोजकांनी गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्यास गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.

Web Title: Runs against 'Gayatri Marketing'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.