निधीसाठी संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:23 AM2017-10-17T00:23:25+5:302017-10-17T00:23:30+5:30
सहा कोटींचा निधी : अज्ञातस्थळी चर्चा नाशिक : जिल्हा परिषदेत सलग तीन दिवस ठिय्या आंदोलन करून पदरात पडलेल्या सहा कोटींचा निधी जिल्हा परिषदेकडून अन्यत्र वर्ग होण्याची चिन्हे दिसताच सोमवारी (दि.१६) जिल्हा परिषद ठेकेदार संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी हा निधी पदरात पाडून घेण्यासाठी धावपळ सुरू केल्याचे चित्र होते.
सहा कोटींचा निधी : अज्ञातस्थळी चर्चा
नाशिक : जिल्हा परिषदेत सलग तीन दिवस ठिय्या आंदोलन करून पदरात पडलेल्या सहा कोटींचा निधी जिल्हा परिषदेकडून अन्यत्र वर्ग होण्याची चिन्हे दिसताच सोमवारी (दि.१६) जिल्हा परिषद ठेकेदार संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी हा निधी पदरात पाडून घेण्यासाठी धावपळ सुरू केल्याचे चित्र होते.
दरम्यान, या सहा कोटींत नेमके कोणाचे आणि किती देयके काढावीत, यासाठी सोमवारी जिल्हा परिषद ठेकेदार संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी जिल्हा परिषदेच्यानजीकच अज्ञातस्थळी बैठक झाल्याचे समजते. या बैठकीत निधी वितरणाच्या वाटपावरून गरमागरम चर्चा झाल्याचे कळते.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम व अर्थ समिती सभापती मनीषा पवार यांनी यापूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांना पत्र देऊन जिल्हा बॅँकेकडून काही निधी प्राप्त झाल्यास त्याचा प्राधान्यक्रम ठरविण्याची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आहे ते सहा कोटी अन्यत्र वर्ग होण्याच्या भीतीने जिल्हा परिषद ठेकेदार संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी जिल्हा परिषदेच्या नजीकच अज्ञातस्थळी बैठक घेऊन सहा कोटींची यादी अंतिम केल्याचे कळते. जिल्हा परिषदेच्या ठेकेदार संघर्ष समितीने मागील आठवड्यात सलग दोन दिवस मुख्य लेखा व वित्त अधिकाºयांच्या कक्षात व बाहेर ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कक्षात आंदोेलन केले होते. अखेरीस जिल्हा बॅँकेच्या पायºयांवरही जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांसह आंदोलन केले होते. त्यानंतर सहा कोटींचा निधी तत्काळ कसा आणि कोणा-कोणाला प्राधान्यक्रमाने वाटप करायच याची खलबते या बैठकीत झाल्याचे कळते. सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हा परिषद ठेकेदार संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांकडून लेखा विभागाला सहा कोटींची यादी सादर करण्याचे काम सुरू होते.