गैरव्यवहारप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 11:20 PM2020-02-19T23:20:41+5:302020-02-20T00:11:46+5:30

दिंडोरी : तालुक्यातील इंदोरे येथील ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ...

Rural Aggression for Misconduct | गैरव्यवहारप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक

गैरव्यवहारप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक

Next
ठळक मुद्देग्रामपंचायत : ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

दिंडोरी : तालुक्यातील इंदोरे येथील ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना देऊन पाच महिने उलटले तरी कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीस कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
इंदोरे ग्रामपंचायतीतील गैरव्यवहारासंबंधी अनिल उमरे, ज्ञानेश्वर गवळी, शकील शेख, विनोद दरगोडे, शिवाजी दरगोडे, विजय लोखंडे, रोशन लोखंडे, संदीप लोखंडे, मोईद्दीन सय्यद आदींनी विभागीय आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक दिंडोरी आदींना सविस्तर निवेदन दिले आहे. तक्रारदारांनी एकूण नऊ मुद्दे उपस्थित केले, त्यात व्यायामशाळा व साहित्य, सभामंडप व इतर काही विकासकामां- बाबत आक्षेप होता. त्याचा सविस्तर चौकशी अहवाल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनी जिल्हा परिषदेकडे पाठविला होता. त्यानुसार ११ सप्टेंबर २०१९ रोजी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना सदर प्रकरणी ग्रामसेवक ए. एम. सुपे यांना दोषी आढळल्याचे सांगत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते, मात्र पाच महिने उलटले तरी अद्याप कारवाई झाली नसल्याचा आरोप करत तक्रारदारांनी सात दिवसात ग्रामसेवक व संबंधित दोषींवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी होत आहे.
इंदोरे ग्रामपंचायतमध्ये २०१६ पासून मी कार्यरत आहे. त्यापूर्वी झालेल्या कामांबाबत माझा कोणताही संबंध नाही. माझ्या कार्यकाळात अंदाजपत्रक व मूल्यांकनाप्रमाणे विकासकामे झाली आहेत.
- ए. एम. सुपे, ग्रामसेवक, इंदोरे

Web Title: Rural Aggression for Misconduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.