बोकटे येथे ग्रामीण कृषी जागृती अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 11:20 PM2021-07-18T23:20:26+5:302021-07-19T00:20:05+5:30
येवला : तालुक्यातील बोकटे येथे ग्रामीण कृषी जागृती अभियान घेण्यात आले. श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी जयश्री सुनील साठे हिने हा उपक्रम राबविला.
येवला : तालुक्यातील बोकटे येथे ग्रामीण कृषी जागृती अभियान घेण्यात आले. श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी जयश्री सुनील साठे हिने हा उपक्रम राबविला.
कृषी औद्योगिक कार्यानुभव आणि ग्रामीण कृषी जागृती अभियानासाठी जयश्री साठे हिने ग्रामसेवक भाऊराव मोरे, तलाठी अश्विनी शेंडे, पोलीस पाटील सुरेश दाभाडे, कृषी सहायक गिरी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधून गावाची माहिती जमा करीत देविदास दाभाडे यांच्या शेतात जाऊन पिकांचा आढावा घेतला. अभियानात साठे हिने शेतकऱ्यांना माती परीक्षण, बीज प्रक्रिया, स्वच्छ दूध उत्पादन, प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती करणे, कीड नियंत्रण पिकांची फवारणी करतानाची घ्यावयाची काळजी, आदींबाबत विविध योजनांची माहिती दिली. उपक्रम यशस्वीतेसाठी संस्थाध्यक्ष साहेबराव नवले, डॉ. अशोक कडलग, डॉ. अरविंद हारदे, प्रा. नीलेश तायडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. नेहा काळे, आदींसह विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले.