ग्रामीण भागात रांगा कायम

By admin | Published: November 16, 2016 11:59 PM2016-11-16T23:59:56+5:302016-11-16T23:56:17+5:30

चलन तुटवडा : नागरिकांची धावपळ सुरूच

In the rural areas, the queues continue | ग्रामीण भागात रांगा कायम

ग्रामीण भागात रांगा कायम

Next

 नाशिक : नोटा बदलण्यासाठी ग्रामीण भागात अजूनही बॅँकांमध्ये गर्दी कायम असून, नागरिकांची धावपळ सुरूच आहे. सुटे पैसे चलनात नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे.
ब्राह्मणगाव : जिल्हा बँकेने एक हजार व पाचशेच्या नोटा स्वीकारणे बंद केल्याने सर्वसामान्य ग्राहकांचा मोर्चा राष्ट्रीयीकृत बँकांकडे वळाला असून, पैसे भरणे, नोटा बदलणे, पैसे काढणेकामी ग्राहक सकाळपासून रांगेत उभे राहत आहेत. जिल्हा बँकेबरोबर सहकारी संस्था, पतसंस्था यांचेही व्यवहार ठप्प आहेत. दोन हजारांच्या नोटांपेक्षा शंभरच्या नोटा जास्त असणे गरजेचे आहे. दोन हजाराचे सुटे मिळणे अवघड होत असून, नोटा भरणे, काढनेकामी पॅन कार्ड, आधार कार्ड झेरॉक्स सोबत असणे गरजेचे आहे.
चार पाच दिवस उलटूनही व रांगेत उभे राहूनही ग्राहकांमध्ये फारशी नाराजी नाही. मोदी सरकारच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
जिल्हा बँकेतील भरणा घेणे चालू करण्याची मागणी वाढली आहे. ग्रामीण भागात ग्राहकांची धावपळ सुरूच असल्याचे चित्र आहे. (लोकमत ब्यूरो)ब्राह्मणगाव येथील देना बॅँकेत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे असलेले ग्राहक.

Web Title: In the rural areas, the queues continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.