ग्रामीण भागात विनामास्क वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 08:37 PM2021-02-23T20:37:38+5:302021-02-24T00:44:23+5:30
देवगांव : कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले असताना ग्रामीण भागात शासनाच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अनेक ठिकाणी ह्यनो मास्क, नो एन्ट्रीह्ण असे फलक नुसतेच नावापुरता लावलेले असून अनेकजण बाजारपेठेत विना मास्क सर्रास फिरतांना दिसून येत आहेत.

प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना आणि त्याला लाभलेले नागरिकांचे सहकार्य यामुळे कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव मागील काही दिवसांपासून कमी झाला होता. तथापि कोरोना काळात लागू केलेले निर्बंध हळू हळू शिथिल केल्यानंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. मात्र मास्क वापरणे बंधनकारक असताना त्याचे पालन होताना दिसून येत नाही. कोविडचे लसीकरण अद्याप पूर्ण झालेले नसल्याने व तालुक्यात रुग्ण दगावण्याच्या घटना घडलेल्या असल्याने मास्कचा नियमित वापर हाच सध्यातरी कोरोनापासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग मानला जात आहे. मास्कचे महत्व जनमानसात प्रसारित करण्यासाठी ह्य मास्क नाही तर प्रवेश नाहीह्ण ही मोहीम प्रभावी रीतीने राबविण्यात येत आहे.परंतु त्याबाबत दुर्लक्ष होत असून स्थानिक स्वराज्य संस्थांनीही हात टेकले आहेत. प्रवासी आणि ग्रामीण भागातील व्यापारी, रहिवासी व ग्राहकवर्ग त्याबाबत तितकासा गंभीर नसल्याचे आढळत आहे. त्यामुळे स्थानिक व तालुका प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.