ढकांबे गावामध्ये ग्रामीण जागृकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 10:34 PM2020-09-12T22:34:07+5:302020-09-13T00:14:21+5:30
दिंडोरी : महात्मा फुले कृषी विद्यापिठ राहुरी अंतर्गत श्रीराम कृषी महाविद्यालय पानीव येथील कृषीदुत निलेश अशोक जगताप यांचे कडून ढकांबे गावात विविध प्रात्यक्षिक तसेच चर्चा सञांचे आयोजन करण्यात येत आहे.
दिंडोरी : महात्मा फुले कृषी विद्यापिठ राहुरी अंतर्गत श्रीराम कृषी महाविद्यालय पानीव येथील कृषीदुत निलेश अशोक जगताप यांचे कडून ढकांबे गावात विविध प्रात्यक्षिक तसेच चर्चा सञांचे आयोजन करण्यात येत आहे. यात कृषीसल्ला चर्चासञ, विविध पिक प्रात्यक्षिक, जनावरांचे लसीकरण व शिबिर, माती परिक्षण तसेच इतर आभ्यासाद्वारे आणि तसेच कृषी व कृषीविस्तार विषयक उपक्रम राबविणार आहे. विद्यार्थी हा श्रीराम कृषी महाविद्यालयाचा असुन श्रीराम कृषीमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हाके,कार्यक्रम समन्वय अधिकारी प्रा. धीरज दोरकर यांच्या मार्गदशर्नाखाली विविध उपक्रम राबविणार आहे. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ढकांबे गावचे सरपंच भाऊसाहेब लक्ष्मण गागोंडे व उपसरपंच सिना नवनाथ आव्हाड, ग्रामसेवक रमेश बाबासाहेब राक यांचे सहकार्य लाभले.