ग्रामीण स्वच्छता नोेंदणीत नाशिक देशात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 01:35 AM2018-09-08T01:35:12+5:302018-09-08T01:35:18+5:30
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत आॅनलाइन प्रतिक्रि या नोंदविण्यात नाशिक जिल्हा देशात अव्वल ठरला असून शुक्रवार, दि. ८ रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार सोहळ्यात जिल्ह्णास गौरविण्यात येणार आहे.
नाशिक : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत आॅनलाइन प्रतिक्रि या नोंदविण्यात नाशिक जिल्हा देशात अव्वल ठरला असून शुक्रवार, दि. ८ रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार सोहळ्यात जिल्ह्णास गौरविण्यात येणार आहे.
देश भरात स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या मूल्यांकनासाठी स्वच्छ सर्वेक्षण अभियान १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत राबविण्यात आले. त्याअंतर्गत जिल्ह्णात स्वच्छता फेरी, गृहभेटी, दुचाकी फेरी, श्रमदान मोहीम, आदींद्वारे जनजागृती करण्यात आली होती.
शाळा, अंगणवाडी, प्राथमिक केंद्र येथील स्वच्छता, स्वच्छतागृहांची स्वच्छता व दुरु स्ती करण्यात आली तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये रंगविण्यात येऊन सुशोभिकरण करण्यात आले.
या मोहिमेत जिल्ह्णात कुटुंबसंपर्क अभियान राबविण्यात आल्याने लोकसहभाग मोठ्या प्रमाणात वाढल्याचेही गिते यांनी सांगितले.
—इन्फो—
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात पाणी गुणवत्ता, पिण्याचे पाणी व सांडपाणी व्यवस्थापन यासाठी देण्यात येणारा स्व. वसंतराव नाईक पुरस्कार दिंडोरी तालुक्यातील अवनखेड ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी दिली.