ग्रामविकास विभागाच्या रखडलेल्या बदल्यांना मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 07:15 PM2019-08-06T19:15:41+5:302019-08-06T19:17:40+5:30
बदली आदेश ग्रामविकास विभागाने काढले असून, त्यात राज्यातील ६० अधिका-यांचा समावेश आहे. बदल्यांमध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी एम. जी. सांगळे यांची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात सहायक आयुक्त (तपासणी) पदावर नियुक्ती झाली
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेल्या बदल्यांमुळे ग्रामविकास विभागाच्या कामकाजावर होणारा परिणाम अखेर संपुष्टात आला असून, मे महिन्यात होऊ पाहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना आॅगस्टमध्ये मुहूर्त सापडून अनेक अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये नाशिक जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारीपदी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांचे स्वीय सहायक रवींद्र परदेशी यांची नियुक्ती झाली असून, जिल्ह्यातील बागलाण, नाशिक, नांदगाव, मालेगाव, दिंडोरी, सुरगाणा या पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांच्या बदल्या झाल्या आहेत.
याबाबतचे बदली आदेश ग्रामविकास विभागाने काढले असून, त्यात राज्यातील ६० अधिका-यांचा समावेश आहे. बदल्यांमध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी एम. जी. सांगळे यांची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात सहायक आयुक्त (तपासणी) पदावर नियुक्ती झाली आहे. इशादिन शेळकंदे यांना प्रतिनियुक्तीवर जि. प.च्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारीपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे यांची बागलाण गटविकास अधिकारी म्हणून बदली झाली आहे. सुरगाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी के. एल. गड्डापोड यांची नांदेड हदगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी बदली झाली आहे. बागलाण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जी. आर. देवरे यांची मालेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी बदली झाली आहे. मालेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ए. पी. पिंगळे यांची धुळे पंचायत समितीत गटविकास अधिकारी यापदी नियुक्ती झाली आहे. दिंडोरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी. के. बेडसे यांची नंदुरबार जिल्हा परिषदेत उपमुख्यकार्यकारी अधिकारीपदी पदोन्नती झाली आहे. नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी यांची साक्री (जि.धुळे) पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी बदली झाली आहे.