आपले काम आपणच केले तरच ग्रामविकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:25 AM2020-12-03T04:25:11+5:302020-12-03T04:25:11+5:30

कळवण : प्रत्येक नागरिकाने आपले काम आपणच केले तर ग्रामविकास आणि त्याबरोबरच देशाचा विकास होईल, असा विश्वास स्मार्ट व्हिलेजचे ...

Rural development only if you do your work | आपले काम आपणच केले तरच ग्रामविकास

आपले काम आपणच केले तरच ग्रामविकास

Next

कळवण : प्रत्येक नागरिकाने आपले काम आपणच केले तर ग्रामविकास आणि त्याबरोबरच देशाचा विकास होईल, असा विश्वास स्मार्ट व्हिलेजचे प्रणेते आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी केले.

दळवट येथे माजी आदिवासी विकासमंत्री स्व. ए.टी. पवार यांच्या ८३व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात पेरे बोलत होते. नितीन पवार मित्रमंडळातर्फे भास्करराव पेरे-पाटील यांचे ‘सर्वांगीण ग्रामीण विकासात जनतेचा सहभाग’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲड.शशिकांत पवार होते.

प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती शकुंतला पवार, देवीदास पवार, कौतिक पगार, धनंजय पवार, अशोक पवार, शंकरराव मराठे, सौं जयश्री पवार, सौ. गीतांजली गोळे पवार, नारायण हिरे, चिंतामण गावीत, गोपाळ धूम, राऊत, सुवर्णा गांगोडे, मीनाक्षी चौरे, कारभारी आहेर, महेंद्र हिरे, सखाराम भोये, पोपट वाघ, अंबादास जाधव आदी मान्यवर होते.

प्रारंभी स्व. ए. टी. पवार यांच्या समाधिस्थळाला मान्यवरांनी अभिवादन केले. भास्करराव पेरे यांचा सत्कार आमदार नितीन पवार यांनी केला.

पाटील पुढे म्हणाले की, जनतेला शासकीय योजनांची सवय लागल्यामुळे आळशीपणा वाढला आहे, दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची सवय लागली, त्यामुळेच नागरिकांच्या कर्तव्याचा विसर पडला. ग्रामपंचायतीचा कर प्रत्येक नागरिकाने नियमित भरला तर आमदार निधीची गरज भासणार नाही, शासकीय योजनांवर अवलंबून न राहता ग्रामपंचायतीने उद्योग सुरू करावे, असे आवाहन त्यांनी केले. मुलांचे शिक्षणासाठी शाळा महत्त्वाची असल्यामुळे या कामाला ग्रामपंचायतीने प्राधान्य देण्याचे आवाहन पेरे पाटील यांनी केले. तालुक्यातील जनतेला ए. टी. पवारांसारखा नेता लाभला. त्यामुळे चौफेर विकास झाल्याचे गौरवेद‌्गार त्यांनी काढले.

यावेळी शरद गुंजाळ, मधुकर जाधव, मोतीराम पवार, विजय शिरसाठ, राजू पवार, राजू पाटील, लाला जाधव, अलका कनोज, सपना पगार, अशोक देशमुख, भिवा बागुल, रमेश पवार, संदीप वाघ, विलास रौंदळ, शांताराम जाधव, संदीप पगार, डी. एम. गायकवाड, सागर खैरनार, रघुनाथ महाजन आदींसह कळवण व सुरगाणा तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक राजेंद्र भामरे, सूत्रसंचालन राकेश हिरे तर आभार मनोज बेलदार यांनी मानले.

कळवणला रक्तदान

ए.टी. पवार यांच्या जयंतीनिमित्त महाराज युवा फाउण्डेशन यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय कळवण यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये ११२ पिशव्या संकलन झाल्याचे महाराज युवा फाउण्डेशनचे अध्यक्ष रोहित पगार यांनी सांगितले.

फोटो : ०१कळवण

===Photopath===

011220\01nsk_42_01122020_13.jpg

===Caption===

स्व. ए. टी पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानप्रसंगी भास्करराव पेरे. समवेत व्यासपीठावर उपस्थित मान्यवर.

Web Title: Rural development only if you do your work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.