ग्रामीण डाकसेवकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 11:50 PM2017-08-22T23:50:57+5:302017-08-24T00:27:31+5:30

ग्रामीण डाकसेवकांना टपाल खात्यात समाविष्ट करून सातवा आयोग लागू करावा या प्रलंबित प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी ग्रामीण डाकसेवकांनी टपाल खात्याच्या प्रशासनाविरोधात एल्गार पुकारत बेमुदत संप पुकारला आहे. मंगळवारी (दि.२२) ग्रामीण डाकसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

 Rural Mail Service Forum | ग्रामीण डाकसेवकांचा मोर्चा

ग्रामीण डाकसेवकांचा मोर्चा

Next

नाशिक : ग्रामीण डाकसेवकांना टपाल खात्यात समाविष्ट करून सातवा आयोग लागू करावा या प्रलंबित प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी ग्रामीण डाकसेवकांनी टपाल खात्याच्या प्रशासनाविरोधात एल्गार पुकारत बेमुदत संप पुकारला आहे. मंगळवारी (दि.२२) ग्रामीण डाकसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. टपाल खात्याचा मुख्य कणा मानला जाणारा ग्रामीण डाकसेवक हा घटक आजही उपेक्षित असून, न्यायहक्कांसाठी संघर्ष करीत आहे. टपाल वाटपापासून ते लिपिकापर्यंत आणि सर्वच सरकारी योजनांचा प्रचार-प्रसार व अंमलबजावणीपर्यंत विविध कामे गावपातळीवर आदिवासी दुर्गम भागात विविध अडचणींना तोंड देत करणाºया ग्रामीण डाकसेवकांकडे टपाल खात्याने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. यामुळे ग्रामीण डाकसेवकांच्या आॅल इंडिया पोस्टल जीडीएस एम्प्लॉइज युनियन या संघटनेने देशव्यापी संप पुकारला आहे. या संपामध्ये नाशिक विभागाच्या सुमारे तीनशे कर्मचाºयांनी सहभाग घेतला आहे.  दरम्यान, मंगळवारी जीपीओ रस्त्यावरील मुख्य डाकघर कार्यालयापासून मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने ग्रामीण डाकसेवक सहभागी झाले होते. ‘अनुकंपा तत्त्वामार्फत सर्वांना सेवेत घ्या’, ‘नियमित कर्मचाºयांप्रमाणे सुविधा द्या, भेदभाव बंद करा’, ‘डाकसेवकांची पिळवणूक थांबवा’, ‘सातवा वेतन आयोग लागू करा’, ‘रिक्त जागा त्वरित भरा’ आदी मागण्यांचे फलक मार्चेकरांनी झळकविले. तसेच हमारी युनियन, हमारी ताकद...जीडीएस युनियन जिंदाबाद... जीडीएस एकता जिंदाबादच्या घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मोर्चाचे नेतृत्व अध्यक्ष राजाराम जाधव, सचिव सुनील यांनी केले. बी.डी. भालेकर मैदान, शालिमार, सीबीएसमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. यावेळी सहभागी मोर्चे कºयांनी जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी जाधव, जगताप यांच्यासह प्रकाश पाटील, नंदू निकम, संजय उगले, गोपिनाथ शिरसाठ, जयश्री मुरकुटे, सायली वाणी, सविता कदम आदि उपस्थित होते.



मुख्य टपाल कार्यालयापुढे निदर्शने करताना ग्रामीण डाकसेवक कर्मचारी.

Web Title:  Rural Mail Service Forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.