हनी ट्रॅपविरोधात ग्रामीण पोलिसांची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:11 AM2021-06-04T04:11:54+5:302021-06-04T04:11:54+5:30
जनजागृती : सतर्क राहण्याचे नागरिकांना आवाहन ओझर : फेसबुकवर सुंदर प्रोफाइल फोटो असलेल्या अनोळखी तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट येते. आकर्षणापोटी ...
जनजागृती : सतर्क राहण्याचे नागरिकांना आवाहन
ओझर : फेसबुकवर सुंदर प्रोफाइल फोटो असलेल्या अनोळखी तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट येते. आकर्षणापोटी तरुणांकडून फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली जाते. मग सुरू होते ऑनलाइन चॅटिंग. बोलणे वाढल्यानंतर व्हिडीओ कॉल होतो आणि तरुण अलगद ‘हनी ट्रॅप’मध्ये फसला जातो. या प्रकरणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी जनजागृती करत हनी ट्रॅपविरोधात मोहीम हाती घेतली आहे.
व्हिडीओ कॉलवर झालेले अश्लील संभाषण नातेवाइकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली जात असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. याबाबत काही तरुणांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे, तर बदनामीच्या भीतीने काही तरुण तक्रार देण्यास टाळाटाळ करत आहेत.
फेसबुक अकाउंट क्लोन करण्याचे प्रकारही वाढले आहेत. मागील काही दिवसांमध्ये फेसबुक प्रोफाईलवरील माहिती चोरून दुसऱ्यांच्या नावाने बनावट अकाउंट सुरू केले जात असल्याचे उघडकीस आले आहे. या पार्श्वभूमीवर फेसबुकवरील खासगी माहिती चोरीला जाऊ नये म्हणून फेसबुक अकाउंट लॉक करून ठेवावे तसेच अशा प्रकारे पैशांची मागणी झाल्यास संबंधित व्यक्तीशी प्रत्यक्ष फोनद्वारे चर्चा करावी, असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलिसांनी केले आहे.
----------------
अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नये. फेसबुकवर आलेल्या अश्लील लिंक ओपन करू नयेत. अश्लील फोटो किंवा व्हिडीओ शेअर करू नयेत. सर्वांनीच भान ठेवून समाज माध्यमांचा वापर करावा. आर्थिक नुकसान व बदनामी करून घेण्यापेक्षा अँड्रॉइड मोबािल वापरताना व त्यातील फेसबुक, व्हॉट्सॲप अशा समाज माध्यमांचा वापर करताना सर्वांनीच खबरदारी घ्यावी.
- सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण
फोटो- ०२ हनी ट्रॅप
===Photopath===
020621\095002nsk_42_02062021_13.jpg
===Caption===
फोटो- ०२ हनी ट्रॅप