ग्रामीण पोलीस, क्र ीडा प्रबोधिनी या संघांना अजिंक्यपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 05:55 PM2019-12-10T17:55:43+5:302019-12-10T17:56:24+5:30

मनमाड : नाशिक जिल्हा अजिंक्यपद व चाचणी कबड्डी स्पर्धेत पुरु षांमध्ये नाशिक ग्रामीण पोलीस तर महिलांमध्ये क्र ीडा प्रबोधिनी,नाशिक या संघांनी अजिंक्यपद पटकाविले.

   Rural Police, Sports Prabodhini teams unbeaten | ग्रामीण पोलीस, क्र ीडा प्रबोधिनी या संघांना अजिंक्यपद

मनमाड येथे विजेत्या खेळाडूंसमवेत राजेंद्र पगार, मोहन गायकवाड, दिलीप नरवडे, अनिल निरभवणे, कैलास आहिरे, आनंद खरे आदी.

Next
ठळक मुद्दे मनमाड : नाशिक जिल्हा अजिंक्यपद व चाचणी कबड्डी स्पर्धेत पुरु षांमध्ये नाशिक ग्रामीण पोलीस तर महिलांमध्ये क्र ीडा प्रबोधिनी,नाशिक या संघांनी अजिंक्यपद पटकाविले. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्र ीडांगणावर मनमाड बॉइज संघाच्या यजमान पदाखाली स्पर्धेमध्ये


मनमाड : नाशिक जिल्हा अजिंक्यपद व चाचणी कबड्डी स्पर्धेत पुरु षांमध्ये नाशिक ग्रामीण पोलीस तर महिलांमध्ये क्र ीडा प्रबोधिनी,नाशिक या संघांनी अजिंक्यपद पटकाविले.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्र ीडांगणावर मनमाड बॉइज संघाच्या यजमान पदाखाली स्पर्धेमध्ये पुरु षांच्या उपांत्य फेरी सामन्यात क्र ीडा प्रबोधिनी, नाशिकने ब्रह्मा,आडगाव संघाचा २६-४१ धुव्वा उडविला तर दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये नाशिक ग्रामीण पोलीस संघाने एनटीपीएस, एकलहरे संघाला २१-१८ गुणांनी धूळ चारीत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात नाशिक ग्रामीण पोलीस संघाने क्र ीडा प्रबोधिनी संघाचा ४७-१३ गुणांनी एकतर्फी पराभव करीत अजिंक्यपद पटकावले. नाशिक ग्रामीण संघाकडून विक्र ांत मांगडे, कपालेश्वर ढिकले, फैजूल रहेमान यांनी चौफेर चढाया केल्या. दिनेश जाधव यांनी अचूक पकडी केल्या.
महिलांच्या उपांत्य फेरीमध्ये क्र ीडा प्रबोधनी, नाशिक संघाने कै. उत्तमराव ढिकले पिंप्री संघाचा ४०-७ फरकाने पराभव करून अंतिम फेरी गाठली, तर दुसºया उपांत्य फेरीमध्ये अटीतटीच्या सामन्यात शिखरेवाडी, नाशिकरोड संघाने शिवशक्ती आडगाव संघाचा २०-२२ संघाचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात क्र ीडा प्रबोधिनी, नाशिक संघाने शिखरेवाडी, नाशिकरोड संघाचा ४३-२७ असा फरकाने पराभव करीत अजिंक्यपद पटकावले.
या स्पर्धेतून नाशिक जिल्ह्याचा महिला व पुरु षांच्या कबड्डी संघाची निवड करण्यात येणार असून, चिपळूण-रत्नागिरी येथे होणाºया राज्य अजिंक्यपद व चाचणी कबड्डी स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल.
अजिंक्यपद पटकावलेल्या संघास नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या दिवंगत गणपत आहिरे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा फिरता चषक देऊन गौरविण्यात आले. माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड, रिपाइं शहराध्यक्ष दिलीप नरवडे, कामगार नेते अनिलदादा निरभवणे , कैलास आहिरे, डॉ. शरद शिंदे, वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, समाजसेवक संजय कटारे, पापा थॉमस, पंच मंडळाचे सतीश सूर्यवंशी, कैलास खैरे आदींच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण झाले. मनमाड बॉइज संघाचे प्रमुख शेखर आहिरे, भूषण दरगुडे, रोहन बागुल, चेतन पगारे, प्रवीण व्हडगर, तेजस भडके, आदेश कदम, ओम कदम, ऋषिकेश आव्हाड, बापू पगारे, नचिकेत वाघ, प्रफुल्ल आहिरे, प्रफुल्ल बागुल, दिलीप शिरसाठ यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
 

 

 

Web Title:    Rural Police, Sports Prabodhini teams unbeaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.