महापालिकेत मुलाखतीसाठी उडाली झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:14 AM2021-03-24T04:14:21+5:302021-03-24T04:14:21+5:30
नाशिक- महापालिकेच्या मुख्यालयात कोरोना संसर्गाचा पुन्हा शिरकाव झाला असून चौदा कर्मचारी बाधित आढळले असतानाच मंगळवारी (दि.२०) पुन्हा एकदा ...
नाशिक- महापालिकेच्या मुख्यालयात कोरोना संसर्गाचा पुन्हा शिरकाव झाला असून चौदा कर्मचारी बाधित आढळले असतानाच मंगळवारी (दि.२०) पुन्हा एकदा मुलखतींच्या निमित्ताने गर्दी उसळली. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
कोरोना पुन्हा आल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागात भरती सुरू झाली आहे. ३१ जानेवारीस महापालिकेने ८७० कंत्राटी कर्मचाऱ्यांना निरोप दिला होता. मात्र फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा कोरोना संसर्ग वाढु लागल्याने महापालिकेने ज्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले हेाते, त्यांनाच पुन्हा रूजू होण्यासाठी विचारणा केली. एकुण पाचशे कर्मचाऱ्यांच्या तात्पुरत्या भरतीचे नियेाजन करण्यात आले हेाते. मात्र, त्यानंतर २७८ कर्मचारीच रूजु झाले. त्यानंतर आता पुन्हा २०९ पदांसाठी भरती मोहीम राबवण्यत येत असून २५ एमबीबीएस आणि ३० बीएएमएस असे ५५ वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. उर्वरीत पदांमध्ये मायक्रोबायोलॉजीस्ट, एमएस्सी मायक्रोबायोलॉजीस्थ, प्रयोग शाळा तंत्रज्ञ, परीचारीका, ए. एन. एम, डाटा एन्ट्री ऑपरेटर अशी विविध पदे आहेत.
महापालिकेच्या मुख्यालयात त्यासाठी वॉक इन इंटरव्ह्यू ठेवण्यात आल्या हाेत्या. त्यामुळे सकाळपासूनच मुख्यालयात प्रचंड गर्दी झाली होती. रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास हे मुलाखती संपल्या. तथापि, महापालिकेत मुळातच कर्मचाऱ्यांबरोबरच नगरसेवक, राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरीकांची गर्दी त्यात मुलाखतीसाठी सुमारे साडे चारशे उमेदवार रांगा लावून असल्याचे चित्र हेाते. महापालिकेने या मुलाखती कालीदास कलामंदिर, भालेकर हायस्कूल किंवा तत्सम ठिकाणी ठेवल्या असत्या तर एवढी गर्दी झाली नसती अशी प्रतिक्रीया यावेळी मनपा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
कोट...
तातडीची भरती करण्यासाठी मुलाखतीचे नियोजन करण्यात आले हेाते. वॉक इन इंटरव्ह्यूसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते. मुलाखती सुरळीत पार पडल्या.
- डॉ. बापुसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, मनपा
===Photopath===
230321\23nsk_47_23032021_13.jpg
===Caption===
महापालिकेत मुलाखतीसाठी उडाली झुंबड