खरिपाच्या कामांची लगीनघाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 10:08 PM2020-06-11T22:08:03+5:302020-06-12T00:29:23+5:30

पेठ : मागील आठवड्यात निसर्ग चक्रीवादळाच्या निमित्ताने पेठ तालुक्यात पहिलाच पाऊस समाधानकारक झाल्याने खरिपाच्या शेतकामांना वेग आला असून, भात बियाणाची पेरणी सुरू झाली आहे.

The rush for kharif work | खरिपाच्या कामांची लगीनघाई

खरिपाच्या कामांची लगीनघाई

googlenewsNext

पेठ : मागील आठवड्यात निसर्ग चक्रीवादळाच्या निमित्ताने पेठ तालुक्यात पहिलाच पाऊस समाधानकारक झाल्याने खरिपाच्या शेतकामांना वेग आला असून, भात बियाणाची पेरणी सुरू झाली आहे. तालुक्यात साधारण १४५ गावांत खरीप हंगामात भात, नागली, वरी, तूर, उडीद ही
पिके प्रामुख्याने घेतली जातात. तालुक्यात खरीप पिकांचे सरासरी पेरणी क्षेत्र २३ हजार ६३९ हेक्टर असून, सन २०१९-२० या आर्थिक वर्षात पड क्षेत्रात कृषी विभागाकडून आदिवासी उपयोजनेतून झालेल्या क्षेत्र उपचराच्या कामांमुळे सुमारे ३०० हेक्टर क्षेत्र भात पिकाखाली येणार असून, खरीप पिकांमध्ये बदल होऊन खरिपाच्या प्रत्यक्ष पेरणी क्षेत्रात वाढ होणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पेठ कृषी विभागातर्फे खरीप हंगामपूर्व तयारी करण्याच्या दृष्टीने शेतकरी बांधवांमध्ये जनजागृती केली जात आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात किमान शारीरिक
अंतर ठेवून गावबैठका व शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहेत.
सदर गावबैठकांतर्गत खरीप हंगामातील प्रमुख पिकांच्या उत्पादकतेत वाढ करण्यासंदर्भात बीजप्रक्रिया, खत व्यवस्थापन,
पाणी व्यवस्थापन, सामूहिक रोपवाटिका तयार करणे, चार सूत्री भात लागवड, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड/रोग व्यवस्थापन, शेतकरी गट बांधणी करणे, पीकविमा काढणेसंबधी शेतकरी बैठकाद्वारे मार्गदर्शन व जनजागृती केली जात आहे.
-------------------
कृषिनिविष्ठा खरेदी करताना विक्री केंद्रात शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये यासाठी शेतकरी गटाच्या माध्यमातून एकत्रित खताची मागणी नोंदविणे व संबंधित गटामार्फत शेतकरी बांधवांना थेट बांधावर निविष्ठा पुरवठा करण्याबाबत नियोजन सुरू असून, आजपर्यंत १२६ गटांच्या माध्यमातून ४७० क्विंटल बियाणे व ७१५ टन खताचा पुरवठा थेट बांधावर करण्यात आला आहे.
यंदा मान्सून समाधानकारक असल्याने व शेतकऱ्यांना वेळेत निविष्ठा उपलब्ध झाल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पेठ तालुक्यात
२६ गावांत भात पिकाच्या शेतीशाळा घेण्याचे नियोजन
असून, शेतीशाळेत प्रामुख्याने महिला शेतकºयांचा सहभाग घेण्यात येणार आहे. नवीन तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवले जाणार आहे.
---------------------
तालुक्यामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत ९० हेक्टर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिकांचे नियोजन असून, त्याअंतर्गत प्रत्येकी १० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाचे ४, नागली पिकाचे ४ तर उडीद पिकाचे २ प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यामध्ये शेतकºयांना बियाणे, खते व औषधे इत्यादी निविष्ठा पुरवल्या जाणार आहेत.
- अरविंद पगारे, तालुका कृषी अधिकारी, पेठ

Web Title: The rush for kharif work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक