लासलगावी नागरिकांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 10:05 PM2020-06-16T22:05:44+5:302020-06-17T00:20:42+5:30
लासलगाव : शहर व परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ उडाली. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लासलगाव : शहर व परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ उडाली. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. यंदाच्या मान्सूनमधला हा पहिलाच पाऊस असल्याने समाधानाचे वातावरण बघावयास मिळाले. अर्धा तासाहून अधिक वेळ पाऊस झाल्याने शहर जलमय झाले होते.
सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. सायंकाळी साडेपाच वाजेनंतर पावसाचा जोर वाढल्याने बऱ्याच भागात वीजपुरवठा खंडित झाला. सलग दुसºया दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे रस्ते जलमय झाले तसेच गोदावरीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. निफाड तालुक्यात सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू होता. सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली.