आॅक्सिजनसाठी धावपळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 01:36 AM2020-09-11T01:36:18+5:302020-09-11T01:36:53+5:30

शहरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत आॅक्सिजन पुरवठा होत नसल्याने शासकीय यंत्रणांची तारांबळ उडत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाला शंभर टन अतिरिक्त आॅक्सिजन पुरवठ्याचे आश्वासन मिळाले असले तरी उत्पादक कंपनीने टॅँकर पाठविण्यास सांगितले आहे. मात्र ती व्यवस्था नसल्याने बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. दुसरीकडे महापालिकेने धावपळ सुरू केली आहे.

The rush for oxygen continues | आॅक्सिजनसाठी धावपळ सुरूच

आॅक्सिजनसाठी धावपळ सुरूच

googlenewsNext
ठळक मुद्देटॅँकर मिळेना : महापालिकेने घातले राज्य शासनाला साकडे

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत आॅक्सिजन पुरवठा होत नसल्याने शासकीय यंत्रणांची तारांबळ उडत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाला शंभर टन अतिरिक्त आॅक्सिजन पुरवठ्याचे आश्वासन मिळाले असले तरी उत्पादक कंपनीने टॅँकर पाठविण्यास सांगितले आहे. मात्र ती व्यवस्था नसल्याने बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. दुसरीकडे महापालिकेने धावपळ सुरू केली आहे.
सध्या लागत असलेल्या आॅक्सिजनच्या तुलनेत दुप्पट आॅक्सिजन उपलब्ध करून घेण्याचे ठरविले असून, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांना नोडेल आॅफिसर म्हणून नियुक्त केले आहे तसेच आॅक्सिजन आणण्यासाठी उद्योजकांकडे असलेल्या टँकरचा वापर करण्यास परवानगी देण्याची मागणी मनपाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारकडे करण्यात आल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, त्यातील गंभीर आजारी रुग्णांना विशेषत: श्वास घेण्यास त्रास होत असणाऱ्या रुग्णांना आॅक्सिजनची मागणी सातत्याने वाढत आहेत. कोरोनापूर्वी लागणाºया आॅक्सिजनच्या तुलनेत आता आठ ते दहा पट अधिक मागणी वाढली आहे. तथापि, उत्पादक कंपन्यांची मर्यादा आणि त्यांना त्यांच्या भागातील मागणीनंतर अन्य पुरवठादारांकडे लक्ष द्यावे लागत असल्याने अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे शासकीय स्तरावर केवळ स्थानिक पुरवठादारांच्या वारंवार बैठका घेतल्या जात आहेत. दोन दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सह आयुक्त माधुरी पवार यांनी मध्यस्थी करून मोठ्या उत्पादक कंपनीला शंभर टन कोटा वाढवून देण्यास प्रवृत्त केले होते. संबंधित कंपनी तयार असली तरी त्यांनी टॅँकर पाठविण्याची घातलेली अट अडचणीची ठरली आहे. स्थानिक पुरवठादारांकडे केवळ पिनॅकल या एकाच पुरवठादाराकडे एकच टॅँकर आहे. त्यामुळे अडचण होत आहे. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनीदेखील पुरवठादारांची बैठक घेतली त्यानंतर गुरुवारी (दि.१०) स्थानिक पुरवठादारांची पुन्हा अन्न व औषध विभागात बैठक झाली. मात्र तोडगा निघाला नसल्याचे समजते.
मनपाचे आयुक्त कैलास जाधव यांनी तातडीने वैद्यकीय विभागाची तातडीने बैठक घेतली. सध्याची गरज बघता शहरासाठी अतिरिक्त २० टक्के अधिकचा आॅक्सिजन पुरवठा वाढविण्यात येणार आहे.
काळजीचे कारण नाही
कोरोनाचे रु ग्ण वाढत असले तरी नागरिकांनी काळजी करण्याची गरज नसून उपचारासाठी आरोग्य व्यवस्था सक्षम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आॅक्सिजनची पुरेशी व्यवस्था असल्याचेही आयुक्त कैलास जाधव यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी शासनाला मदतीचे आवाहन केले असून लवकरच पुरेसा आॅक्सिजन साठा उपलब्ध होईल, नागरिकांनी चिंता करू नये.असे त्यांनी सांगितले.
नाशिक महापालिकेनेदेखील आॅक्सिजन पुरवठ्यासाठी धावपळ सुरू केली आहे. शहराला दररोज सरासरी ३५ मेट्रिक टन लिक्विड आॅक्सिजनची आवश्यकता आहे.
२ महापालिकेला देखील आॅक्सिजन मिळविण्यात अडचणी येत असल्याने अतिरिक्तआयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांना नोडल आॅफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे,
३ महापालिकेला लागणाºया आॅक्सिजनसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे अतिरिक्त मागणी नोंदविण्यात आली आहे.

Web Title: The rush for oxygen continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.