रेमडेसिविरसाठी धावपळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:14 AM2021-04-27T04:14:34+5:302021-04-27T04:14:34+5:30

खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त नाशिक : शहरातील जीपीओ रोडवर सुरू असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात ...

The rush for remediation continues | रेमडेसिविरसाठी धावपळ सुरूच

रेमडेसिविरसाठी धावपळ सुरूच

Next

खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त

नाशिक : शहरातील जीपीओ रोडवर सुरू असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे. या मार्गावरील एका रस्त्यावर खड्डे केल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

आवक कमी झाल्याने दर वाढले

नाशिक : उन्हाळ्यामुळे आवक कमी झाल्याने पालेभाज्यांचे दर वाढले आहेत यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अनेक भाज्यांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.

नियमांचे पालन करण्याचे आवाहन

नाशिक : शहरातील रुग्णालयांमध्ये बेड मिळत नसल्याने अनेक रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार घेत आहेत. घरात असताना या रुग्णांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकहून करण्यात येत आहे.

दुकानांची वेळ बदलण्याची मागणी

नाशिक : अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या किराणा दुकानांना सकाळी ११ वाजेपर्यंतचा वेळ दिला गेल्याने दुकानदारांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. ही वेळ बदलून देण्याची मागणी दुकानदारांकडून केली जात आहे.

समाज माध्यमांवरून जनजागृती

नाशिक : प्रसारमाध्यमांवरून कोरोनाबाबतच्या वृत्तांचा सतत भडिमार होत असल्याने अनेक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात असून माध्यमांनी जास्तीत जास्त सकारात्मक बातम्या द्याव्यात, असे आवाहन केले जात आहे.

शेतकऱ्यांकडून शेणखताचा शोध

नाशिक : खरीप हंगामापूर्वी शेतात शेणखत टाकण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडून सध्या शेणखताचा शोध घेतला जात आहे. या वर्षी हे खतही महागल्याने अनेकांना त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. स्थानिक पातळीवरील खताला अधिक प्राधान्य दिले जात आहे.

घरकाम करणाऱ्या महिलांसमोर अडचणी

नाशिक : कोरोनामुळे घरकाम करणाऱ्या अनेक महिलांचा रोजगार बुडाल्याने त्यांना विविध आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरखर्च भागविण्याबरोबरच इतर खर्च करताना या महिलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शासनाने सर्वच महिलांना मदत देण्याची मागणी होत आहे.

खंडित वीजपुरवठ्यामुळे नाराजी

नाशिक : ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दुपारच्या वेळी पुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना घरात बसणे असह्य होते. राज्य वीज वितरण कंपनीने योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

महागाईमुळे गोरगरीब अडचणीत

नाशिक : वाढत्या महागाईमुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे सध्या अनेकांचे रोजगारही बंद आहेत. यामुळे कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

Web Title: The rush for remediation continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.