पाश्चात्त्य संस्कृतीच्या अतिरेकाने नाती हरवली : रामतीर्थंकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:43 AM2018-12-25T00:43:21+5:302018-12-25T00:43:49+5:30
पाश्चिमात्य संस्कृतीच्या अतिरेकामुळे धकाधकीच्या जीवनात नाती हरवत चालली आहे. नाती विखुरली गेल्याने विश्वास कुणावर ठेवावा, हा प्रश्न आहे. त्यामुळे नात्यांवर बोलण्याची आज वेळ आली असल्याचे प्रतिपादन अपर्णाताई रामतीर्थंकर यांनी केले.
नाशिक : पाश्चिमात्य संस्कृतीच्या अतिरेकामुळे धकाधकीच्या जीवनात नाती हरवत चालली आहे. नाती विखुरली गेल्याने विश्वास कुणावर ठेवावा, हा प्रश्न आहे. त्यामुळे नात्यांवर बोलण्याची आज वेळ आली असल्याचे प्रतिपादन अपर्णाताई रामतीर्थंकर यांनी केले.
अत्रेयनंदन कला क्र ीडा सामाजिक संस्था व क्षितिज प्रतिष्ठान नाशिक यांच्या वतीने दत्त जयंतीनिमित्ताने आयोजित तीनदिवसीय व्याख्यानमालेचे दत्त मंदिर परिसर, मीनाताई ठाकरे शाळेमागे कामटवाडा येथे अपर्णाताई रामतीर्थंकर यांनी ‘नाती जपूया’ या विषयावर गुंफले त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी अत्रेयनंदन कला क्र ीडा सामाजिक संस्था व क्षितिज प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र फड, नगरसेवक सुवर्णा मटाले, छाया देवांगे, दीपक दातीर, गोविंद घुगे, नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जयपाल शर्मा, पोलीस निरीक्षक लोहकरे, शोभा फड, सुभाष जांगडा, नितीन भोसले, भरत पटेल, के. के. देशपांडे, अमोल वाघ, योगेश मांडे आदी उपस्थित होते.
यावेळी अपर्णाताई रामतीर्थंकर म्हणाल्या की, टीव्ही आणि मोबाइल या माध्यमातून मुलांवर वाईट परिणाम जास्त होतात. कुटुंब व्यवस्था टिकविण्यासाठी शिक्षणाबरोबर नाती अतिशय महत्त्वाची आहे. शिक्षणाबरोबर घरही तेवढेच महत्त्वाचे आहे. संस्कारांचे कवच घट्ट करून मुलांना शिकवा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी नगरसेविका सुवर्णा मटाले, पोलीस निरीक्षक लोहकरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. यावेळी अपर्णाताई रामतीर्थंकर यांच्या हस्ते महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडीबद्दल अनिल चांदवडकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक राजेंद्र फड यांनी केले. गौरव चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.