एस. जी. पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशोत्सव व पुस्तक वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 05:53 PM2019-06-18T17:53:57+5:302019-06-18T17:54:10+5:30
सिन्नर : नवी शाळा, नवा वर्ग, नवे मित्र व नवे पुस्तके त्यात वाजत गाजत स्वागत. मग काय चिमुकल्यांच्या चेह-यावर फक्त हसू व आनंद. एस. जी. पब्लिक स्कूल प्राथमिक विभागात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण करून बॅन्डपथकाच्या तालात वाज गाजत मिरवत पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
सिन्नर : नवी शाळा, नवा वर्ग, नवे मित्र व नवे पुस्तके त्यात वाजत गाजत स्वागत. मग काय चिमुकल्यांच्या चेह-यावर फक्त हसू व आनंद. एस. जी. पब्लिक स्कूल प्राथमिक विभागात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण करून बॅन्डपथकाच्या तालात वाज गाजत मिरवत पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. व नंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
संस्थेचे सचिव राजेश गडाख, मुख्याध्यापक उदय कुदळे, व्यवस्थापक सोमनाथ थेटे व पालकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्र माचे नियोजन शिक्षक गणेश सुके, जयश्री सोनजे, जीजा ताडगे व भास्कर गुरूळे यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक उदय कुदळे यांनी तर सुञसंचालन विनायक काकुळते यांनी केले.
यावेळी पांडूरंग लोहकरे ,बापू चतुर ,सागर भालेराव ,सतिश बनसोडे, अमोल पवार ,वृषाली जाधव, सुधाकर कोकाटे ,मंदा नागरे, पद्मा गडाख, कविता शिंदे,निलेश मुळे,योगेश चव्हाणके ,कल्याणी रहाणे ,शिवाजी कांदळकर ,संदीप गडाख आदि शिक्षक उपस्थित होते.