देशभक्तीपर समुहगीत स्पर्धेत नायगावच्या एस. एस. के. पब्लिक स्कूलने मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 06:05 PM2020-02-07T18:05:24+5:302020-02-07T18:05:38+5:30
सिन्नर: साथी नाना कपोते यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजीत १७ व्या तालुकास्तरीय देशभक्तीपर समुहगीत स्पर्धेत नायगावच्या एस. एस. के. पब्लीक स्कूलने जिंकत स्व. शांताबाई रणछशेड गुजर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या ३००१ रुपयांच्या बक्षीसावर आपली मोहर उमटवली.
सिन्नर: साथी नाना कपोते यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजीत १७ व्या तालुकास्तरीय देशभक्तीपर समुहगीत स्पर्धेत नायगावच्या एस. एस. के. पब्लीक स्कूलने जिंकत स्व. शांताबाई रणछशेड गुजर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या ३००१ रुपयांच्या बक्षीसावर आपली मोहर उमटवली. माध्यमिक गटात सिन्नरची अशोका स्कूल विजेती ठरली तर यंदा प्रथमच सुरु झालेल्या प्राथमिक गटात सिन्नरच्या अभिनव बाल विकास मंदिराने प्रथम क्र मांक पटकावला.
राष्ट्र सेवा दल, सिध्देश्वर पतसंस्था व महाराष्ट्र बॅँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत साथी नाना कपोते तालुकास्तरीय देशभक्तीपर समुहगीत स्पर्धा सार्वजनिक वाचनालयासमोरील मैदानावर पार पडली. स्पर्धेतील विजेत्यांना माजी आमदार राजाभाऊ वाजे, समतावादी शाहीर प्रा. तुलशीराम जाधव, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, महाराष्ट्र बँकेचे शाखा व्यवस्थापक विशाल वाघ, सेवादलाचे प्रदेश कार्यवाह नचिकेत कोळपकर, तालुकाध्यक्ष अॅड. शिवाजीराव देशमुख, सिध्देश्वर पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन चंद्रकांत गड्डम, नगरसेवक श्रीकांत जाधव, रावसाहेब आढाव, रामचंद्र नरोटे, रामनाथ पावसे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. प्रशांत महाबळ यांनी परिक्षण केले. विलास पाटील यांनी प्रास्ताविक केले. जितेंद्र जगताप, परेश पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. सूत्रसंचलन सागर गुजर, किशोर जाधव यानी केले. आभार अजय शिंदे यांनी मानले.