एस. टी. ची ऑनलाईन बुकिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:18 AM2021-08-25T04:18:59+5:302021-08-25T04:18:59+5:30
अनेकांना ठाऊकही नाही : नाशिक शहरातून मिळते मात्र चांगले उत्पन्न नाशिक : खासगी वाहतूकदारांशी स्पर्धा करण्याकरीता राज्य परिवहन ...
अनेकांना ठाऊकही नाही : नाशिक शहरातून मिळते मात्र चांगले उत्पन्न
नाशिक : खासगी वाहतूकदारांशी स्पर्धा करण्याकरीता राज्य परिवहन महामंडळाने २०११ पासून ऑनलाईन बुकिंग सुरू केलेली आहे. सुरुवातीला या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, त्यानंतर साधनांची उपलब्धता वाढत गेल्यामुळे ऑनलाईन बुकिंगही मंदावली आणि आता अत्यंत धीम्या गतीने बुकिंग होत असल्याचे दिसते.
ऑनलाईन बुकिंग कुठूनही करता येत असल्याने प्रवाशांना त्याचा लाभच होणार असला तरी अल्पावधीतच ऑनलाईन बुकिंग काहीसे मागे पडले. परंतु एकदमच प्रवाशांनी पाठ फिरविली अशीही परिस्थिती राहिलेली नाही. नाशिक-पुणे, नाशिक- मुंबई, नाशिक- कोल्हापूर, नाशिक-नागपूरसाठी तसेच नाशिक-लातूरच्या बसेससाठी ऑनलाईनचा वापर केला जात असल्याचे दिसते. शिवशाही बसेसला अधिक बुकिंग होत असल्याचे समोर आले आहे.
--इन्फेा--
असे करावे लागते ऑनलाईन बुकिंग
एमएसआरटीसी मोबाईल रिझव्हरेशन ॲप डाऊनलोड करून प्रवाशाला ऑनलाईन तिकीट बुकिंग करता येते. त्यामुळे प्रवाशाला गुगलवरून हे ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे. ॲपमध्ये दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाईन माहिती भरल्यानंतर ते अपलोड करावे लागते. त्यामाध्यमातून प्रवासी आपले तिकीट बुकिंग करू शकतात. तिकीट बुक झाल्याचा मेसेज प्रवाशाला प्राप्त होतो.
---कोट--
ऑनलाईन बुकींग आम्हाला ठाऊकच नाही
१) एस.टी. महामंडळाची ऑनलाईन बुकिंग होते, असे बोलेले जाते परंतु तशी कधी वेळच आली नाही. कारण बसेसची उपलब्धता असते शिवाय इतर प्रवासाची साधने असल्यामुळे ऑनलाईन बुकिंग करण्याचा प्रसंग आलेला नाही. बुकिंगसाठी कोणती ऑनलाईन प्रक्रिया आहे याची माहितीही आम्हाला नाही.
- विराज फोकणे, प्रवासी
२) एस.टी. बससाठी ऑनलाईन बुकिंग केली जाते हेच आम्हाला माहीत नाही. बसने नेहमीच प्रवास करत नसल्यामुळे बुकिंग करण्याची वेळ कधी आलेली नाही. महामंडळाकडूनही कधी याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही. रेल्वेचे एकवेळ ठीक परंतु बसला बुकिंग करता येते हेच माहिती नाही.
- विनोद निरगुडे, प्रवासी
--इन्फेा--
नाशिक या डेपोसाठी बुकिंगची व्यवस्था
इगतपुरी
कळवण
लासलगाव
मालेगाव
मनमाड
नांदगाव
नाशिक-१
नाशिक-२
पेठ
पिंपळगाव
सटाणा
सिन्नर
देवळा
--इन्फो--
नाशिक शहरात बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे एस.टी.च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरमहा साधारणपणे सुमारे ४० ते ५० हजार रुपये इतके बुकिंग होते तर इतर बसस्थानकांमध्ये १० ते २० हजारापर्यंतचे बुकिंग मिळत असल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. एस.टी बुकिंगला प्रतिसाद असून केवळ २०११ पासून दर दिवसाची, त्यानंतर महिन्याभराची आणि वर्षभराची १३ डेपोमधून माहिती एकत्रित करणे कठीण असल्याचेही सूत्रांनी सांगितले.