सामुदायिक श्रावणीविधी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:28 AM2017-07-29T01:28:39+5:302017-07-29T01:28:39+5:30
श्रावण महिन्यातील नागपंचमीचा मुहूर्त साधत रविवार कारंजा येथील गोरेराम मंदिरात सामुदायिक श्रावणीचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिक : श्रावण महिन्यातील नागपंचमीचा मुहूर्त साधत रविवार कारंजा येथील गोरेराम मंदिरात सामुदायिक श्रावणीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सद्गुरू बाबा महाराज सहस्त्रबुद्धे समाधी मंदिराचे काका महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक श्रावणी विधीत वेदमूर्ती अनूप काजरेकर आणि उमेश तांबे यांनी आचार्यत्व सांभाळले. चितपावन ब्राह्मण संस्थेत वेदमूर्ती विनायकशास्त्री साने, देशस्थ ऋ ग्वेदी संस्थेतर्फे दुर्गा मंगल कार्यालयात वेदमूर्ती पांडूरंगशास्त्री पैठणकर, मनीष पैठणकर आणि वेदमूर्ती पंकज उंदीरवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा विधी संपन्न झाला. सुमारे चार तास चाललेल्या या पूजेमध्ये प्रामुख्याने देव, ऋषी आणि मनुष्य यांच्या पूजनाप्रीत्यर्थ हवन आणि तर्पण मोठ्या श्रद्धेने केले जाते. हा श्रावणी विधी देशस्थ ऋग्वेदी संस्था, चितपावन ब्राह्मण संस्था , शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्था, मैत्रायणीय शाखा सेवा संघ, तसेच वेदमूर्ती विनायकशास्त्री साने यांच्या पाठशाळेत, वेदमूर्ती शांतारामशास्त्री भानोसे आणि वेदमूर्ती दिनेश गायधनी यांच्या वेद विज्ञान वैदिक पाठशाळा, वेदमूर्ती रवींद्र पैठणे आणि वेदमूर्ती गोविंद पैठणे यांच्या महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान पाठशाळा, वेदमूर्ती अविनाशशास्त्री देव धर्माधिकारी, वेदमूर्ती भालचंद्रशास्त्री शौचे, वेदमूर्ती नितीनशास्त्री मोडक, वेदमूर्ती यशवंत पैठणे, वेदमूर्ती मुकुंदशास्त्री खोचे यांच्या पाठशाळेत तसेच सोमवार पेठ येथील प्रसाद मित्रमंडळ यांच्यातर्फे श्रावणीचा विधी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या श्रावणी विधी दरम्यान देशस्थ ऋग्वेदी संस्थेचे कार्यवाह नरेंद्र कुलकर्णी, मोहिनीराज कुलकर्णी, सचिन निरंतर यांच्यासह पद्माकर देशपांडे, दत्तात्रय बेदरे, अतुल कुलकर्णी, मंदार तगारे, बाबूराव कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.