सचिन पाटील यांनी स्वीकारला पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 01:32 AM2020-09-21T01:32:24+5:302020-09-21T01:32:55+5:30
ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी सचिन पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी रविवारी (दि.२०) कायर्भार स्वीकारला. प्रभारी अधीक्षक व मालेगावचे अपर अधीक्षक संदीप घुगे यांनी पाटील यांचे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वागत करीत त्यांना कायर्भार सोपवला.
नाशिक : ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी सचिन पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी रविवारी (दि.२०) कायर्भार स्वीकारला. प्रभारी अधीक्षक व मालेगावचे अपर अधीक्षक संदीप घुगे यांनी पाटील यांचे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वागत करीत त्यांना कायर्भार सोपवला. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपअधीक्षक श्यामकुमार निपुंगे, अरुंधती राणे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. के. पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
तत्कालीन अधीक्षक डॉ. आरती सिंह यांची अमरावती आयुक्तपदी
बदली झाली. त्यामुळे त्यांनी मागील आठवड्यात नाशिकचा पदभार मालेगावचे अपर अधीक्षक घुगे यांच्याकडे सोपवला होता, तर दुसरीकडे अधीक्षकपदी कोण येते याची उत्सुकता सर्वांना होती. गृहमंत्रालयाने नाशिक जिल्ह्याच्या रिक्त झालेल्या अधीक्षकपदी मुंबई येथील राज्य राखीव दलाचे समादेशक सचिन पाटील यांची नियुक्ती केली. त्यानंतर पाटील यांनी दोन दिवसांत रविवारी सकाळी पोलीस अधीक्षकपदाचा कायर्भार स्वीकारला. पाटील यांनी २०११ मध्ये राज्यपालांचे एडीएस म्हणून कामकाज पाहिले आहे. त्यानंतर २०१५ला ठाणे शहर पोलीस उपआयुक्त, २०१७ला मुंबई पोलीस उपआयुक्त, तर २०१९ पासून राज्य राखीव पोलीस दलाचे ते समादेशक म्हणून कार्यरत होते.