बळीराजा एकवटला; शहरवासीयांचे हाल

By admin | Published: June 2, 2017 01:56 AM2017-06-02T01:56:05+5:302017-06-02T01:57:45+5:30

बळीराजाने गुरुवारी (दि.१) मध्यरात्री बारा वाजेपासून संपाचे हत्यार उपसले.

Sacrifice accumulated; Recent Locations | बळीराजा एकवटला; शहरवासीयांचे हाल

बळीराजा एकवटला; शहरवासीयांचे हाल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ‘सातबारा कोरा करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, शेतीमालाला योग्य हमीभाव द्या, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा’ अशा एकूण सात मागण्यांसाठी राज्याचा पोशिंदा बळीराजाने गुरुवारी (दि.१) मध्यरात्री बारा वाजेपासून संपाचे हत्यार उपसले. यामुळे पंचवटीमधील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती सकाळपासून ओस पडल्याचे चित्र बघावयास मिळाले. याबरोबरच शहरवासीयांना कांद्यापासून तर विविध प्रकारच्या भाज्या व फळभाज्या किरकोळ बाजारातून जादा दराने खरेदी कराव्या लागल्या.
राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांचे किंवा त्यांच्या मागण्यांचे गांभीर्य नसल्याने शेतकऱ्यांच्या संयमाचा उद्रेक झाला आणि अखेर राज्यातील बळीराजाने बेमुदत कालावधीसाठी ‘सुटी’ घेत शहराची रसद रोखली. गुरुवारी मध्यरात्री बारा वाजेपासून सुरू झालेल्या संपाचे पडसाद सूर्योदयानंतर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पहावयास मिळाले. पंचवटीमधील बाजार समितीचे शटर बुधवारी संध्याकाळनंतर उघडलेच नाही. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या संपामुळे बाजार समितीमधील व्यवहार कोलमडले. बाजार समितीमध्ये कु ठल्याही प्रकारचा भाजीपाला उपलब्ध झाला नाही. यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी बाजार समितीमध्ये पाऊ ल ठेवले नाही. किरकोळ भाजीबाजारात भाजीविक्रेत्यांकडून बुधवारी जादा माल खरेदी करण्यात आला होता. यामुळे शहरातील भद्रकाली, रविवार कारंजा, जुने नाशिक, गंगापूररोड, महात्मानगर आदि परिसरात भाजीविक्रेत्यांनी दुकाने नियमितपणे सुरू ठेवली होती. संध्याकाळीदेखील काही उपनगरांमध्ये भाजीबाजार थाटण्यात आला होता. मात्र भाजीपाला किंवा फळभाज्यांचा जास्त साठादेखील करणे लहान विक्रेत्यांना शक्य नाही, कारण हा नाशवंत माल असतो. यामुळे जर बाजार समित्यांमधील व्यवहार शुक्रवारी (दि.२) पूर्ववत झाले नाही तर मात्र नाशिककरांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजीपाला, फळभाज्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होऊन नागरिकांची गैरसोय होण्याची चिन्हे आहेत. कारण किरकोळ विक्रेत्यांना भाजीपाला खरेदी करण्याचा कुठलाही मार्ग उपलब्ध राहणार नसल्यामुळे शहरातील विविध उपनगरांमधील भाजीबाजारही आपोआप बंद होण्याचा धोका उद्भवू शकतो.

Web Title: Sacrifice accumulated; Recent Locations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.