साडेबारा लाखांचे मद्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:26 AM2019-04-05T00:26:28+5:302019-04-05T00:28:53+5:30
नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदेशीर मद्यविक्री, वाहतुकीच्या विरोधात जोरदार मोहीम हाती घेतली असून, गेल्या चोवीस दिवसांत १४७ गुन्हे दाखल करून सुमारे साडेबारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या चोवीस तासांत दोन ठिकाणी छापे मारून गावठी दारू व दादरा नगर हवेली येथून आणण्यात येणारे विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क खात्याला मिळालेल्या माहितीनुसार पंचवटीतील वाघाडी येथे रिक्षामधून गावठी दारूची वाहतूक केली जात असल्याची खबर मिळाल्याने भरारी पथकाने सदरची रिक्षा ताब्यात घेऊन त्यातील ११५ लिटर गावठी दारू जप्त केली तसेच वाहतूक करणारा सरताज रमेश रोकडे, रा. समतानगर, आगरटाकळी यास अटक केली आहे. गुरुवारी रात्री दादरा नगर हवेली येथून कर चुकवेगिरी करून महाराष्टÑात प्रतिबंधित असलेले विदेशी मद्याची वाहतूक करणारी स्कार्पिओ क्रमांक (एम. एच. ०५ जी. २२३५) ही संशयावरून जिल्ह्णाच्या सीमेवरून ताब्यात घेतली असता, त्यात मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याचा साठा सापडला. किसन सुभाष चाफळकर, रा. आंबेडकरनगर, चुंचाळे यास ताब्यात घेण्यात आले असून, मद्याचा साठा व वाहन जप्त करण्यात आले आहे. जिल्ह्णात आचारसंहिता जारी झाल्यानंतर १४७ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यात १२७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधीक्षक चरणसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बाबासाहेब भुतकर, मधुकर राख, दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, हेमंत नेहरे, जवान विलास कुवर, सुनील पाटील, विरेंद्र वाग, विष्णू सानप आदींनी ही कारवाई पार पाडली. या कारवाईत १८,९१० लिटर रसायन, ९३६ लिटर गावठी दारू, ८७२ लिटर देशीदारू, ६२ लिटर विदेशी दारू, १५९ लिटर बिअर, २१५ लिटर ताडी व परराज्यांतून विक्रीसाठी आलेले १२२ लिटर विदेशी मद्याचा साठा जप्त केला असून, मद्याची वाहतूक करणाऱ्या चार दुचाकी, दोन तीनचाकी, दोन चारचाकी वाहने असा १२ लाख, ४७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात आहे.