साधुग्राम, रामकुंड वाहनांना बंद
By Admin | Published: August 5, 2015 12:03 AM2015-08-05T00:03:27+5:302015-08-05T00:03:45+5:30
उपाययोजना : वाहतूक कोंडीसह पोलिसांचे सुरक्षिततेचे कारण
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त साधुग्राम, रामकुंड या परिसरात येणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे होणारी वाहतुकीची कोंडी व सुरक्षिततेच्या कारणास्तव नाशिक पोलिसांनी या भागातील वाहतूक मार्गात मोठे बदल केले असून, त्याची मंगळवारपासून अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. मात्र जे मार्ग पोलिसांनी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद केले त्या मार्गावरील वाहनधारकांनी नेमके काय करावे याचा विचारच पोलिसांनी केलेला नाही.
पोलिसांनी केलेला हा बदल ४ आॅगस्टपासून तब्बल ४८ दिवसांपर्यंत म्हणजे २० सप्टेंबरपर्यंत कायम राहणार असून, साधुग्राममधील ध्वजारोहण, प्रथम, द्वितीय व तृतीय शाहीस्रानानंतर दोन दिवसांनी पोलिसांनी वाहनांसाठी बंद केलेले रस्ते पुन्हा खुले केले जाणार आहेत.या बंदीतून मात्र पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाची वाहने व साधू-महंतांची वाहने वगळण्यात आली आहेत़ (प्रतिनिधी)
भाविकांसाठीची पार्किंग
४साधुग्रामला येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी औरंगाबाद रोडवरील निलगिरीबाग, स्वामिनारायण पोलीस चौकी ते मीनाताई ठाकरे स्टेडियम सर्व्हिस रोड व स्टेडियम लगतचा पाटाचा रस्ता, नाशिक तट डावा कालवा (मिर्ची हॉटेल) ते विडी कामगारनगर चौफुलीकडे जाणाऱ्या रोडवरील दोन्ही बाजूकडील एक-एक लेन, मारुती वेफर्स ते जयशंकर गार्डनकडील रोडच्या दोन्ही बाजूकडील एक-एक
लेनची जागा पार्किंगसाठी ठेवण्यात
आली आहे़