त्र्यंबकेश्वरला साधू-महतांनी बजावला मतदानाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:16 PM2019-04-29T12:16:27+5:302019-04-29T12:16:52+5:30
त्र्यंबकेश्वर : येथे साधुमहंतांनी मतदानचा हक्क बजावला.
त्र्यंबकेश्वर : येथे साधुमहंतांनी मतदानचा हक्क बजावला. येथील मतदान केंद्रांवर सकाळपासून रांगा लागल्या आहेत. उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिकांनी गर्दी केली आहे. या मतदारसंघासाठी एकूण १७३४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर हे दोन तालुके मिळून १२७ अनु.जमाती इगतपुरी विधानसभा मतदारसंघ तयार करण्यात आला आहे. इगतपुरी-त्र्यंबक मिळून एकूण २८९ बूथ (इगतपुरी १५६, त्र्यंबकेश्वर १३३ बूथ) आहेत. या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त दहा टक्के म्हणजे १७३ कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. इगतपुरी, घोटी, वाडीवºहे पोलीस ठाण्यांनी चोख नियोजन करून मतदान केंद्रांवर बंदोबस्त ठेवलेला आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे लवकर मतदान करण्याकडे मतदारांचा कल दिसून आला आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा इगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरमाळे मांडगे यांच्याकडून मतदान परिस्थितीवर सूक्ष्म लक्ष घातले जात आहे. केंद्रात मोबाईल नेण्याला बंदी असल्याने सेल्फी काढणाºया मतदारांची पंचाईत झाली.