साधू गेले, ‘बॅनर’ राहिले
By admin | Published: September 26, 2015 11:10 PM2015-09-26T23:10:58+5:302015-09-26T23:11:39+5:30
साधू गेले,‘बॅनर’ राहिले
नाशिक : साधुग्राममधील बहुतांश खालशातील साधू-महंत सामान आवरून रवाना झाले. मात्र त्यांच्या कथा, प्रवचनाची माहिती देणारे ‘बॅनर’ रस्त्याच्या आजूबाजूला ‘जैसे थे’ आहेत. साहित्य आवरून नेणाऱ्या साधूंच्या खालशातील कामगारांनी बॅनर काढले नाही. त्यामुळे तपोवनातील रस्त्यावर बॅनर ठिकठिकाणी दिसून येत आहेत.
साधुग्राममधील मुख्य रस्त्यावर सर्वाधिक साधू-महंतांचे बॅनर लागले होते. धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर भक्तगणांकडून बॅनर, पोस्टर्स काढण्यात आले नाही. त्यामुळे साधू -महंत रवाना झाल्यानंतरही साधुग्रामच्या रस्त्यावर त्यांचे पोस्टर्स अजूनही झळकत आहेत. रामकथा, श्रीमद्भागवत कथा, रामचरित मानस आदि कार्यक्रमाचे बॅनर याठिकाणी अद्यापही दिसून येत आहे. भाविकांसाठी अन्नदान व सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या संस्थांचे पोस्टर्सही पाहायला मिळतात.
औरंगाबाद नाका, लक्ष्मीनारायण चौक, कपिला संगम, जेलरोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅनर, पोस्टर्सची भाऊगर्दी झाली आहे. (प्रतिनिधी)