अबब..! नाशकात १४ हजार खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 05:57 PM2019-09-17T17:57:22+5:302019-09-17T18:18:49+5:30

शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत होणारे काम हे फक्त सीबीएस परिसरातच दिसून येत आहे मात्र इतर भागांतील रत्यांवर खड्डे बघावयास मिळतात. त्यामुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन अहिरे यांनी गेल्या पाच वर्षात स्वता: शहरभर फिरत सुमारे १३ हजार ७२१ खड्यांचे मोजमाप केले आहे. या खड्यांमध्ये किमान ४ फुट तर कमाल १० फुट खड्डे आढळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Sad..In Nashik 14000 pits in five years | अबब..! नाशकात १४ हजार खड्डे

अबब..! नाशकात १४ हजार खड्डे

googlenewsNext
ठळक मुद्देसुमारे १३ हजार ७२१ खड्यांचे मोजमापकिमान ४ फुट तर कमाल १० फुट खड्डे शहरवासीयांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे

नाशिक : शहरात सर्वत्र खड्यांचे साम्राज्य झाले असून गेल्या अनेक वर्षांपासुन रत्यांची एकसारखी चाळण होत आहे. शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत होणारे काम हे फक्त सीबीएस परिसरातच दिसून येत आहे मात्र इतर भागांतील रत्यांवर खड्डे बघावयास मिळतात. त्यामुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन अहिरे यांनी गेल्या पाच वर्षात स्वता: शहरभर फिरत सुमारे १३ हजार ७२१ खड्यांचे मोजमाप केले आहे. या खड्यांमध्ये किमान ४ फुट तर कमाल १० फुट खड्डे आढळत असल्याचे त्यांनी सांगितले.
आहिरे हे गेल्या पाच वर्षांपासून एक सामाजिक कार्य म्हणुन आणि सत्ताधारांचे लक्ष या खड्यांकडे जाऊन त्यांची दुरुस्ती व्हावी यासाठी शहरभर फिरत आहे. शहरात दिवसागणिक खड्यांची संख्या वाढतच असल्याचे निर्दशनास येत असुन शहरवासीयांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यावेळी खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक वाहन चालकांचा अपघात झाल्याचे दिसत आहे. अशावेळी खड्यांमद्ये तात्पुरत्या स्वरुपात मुरुम टाकण्यात येतो त्यामुळे असे ठिकाण अपघातांना अजुन निमंत्रण देत आहेत. रस्ते महापालिका हद्दीत असो अथवा राज्य किंवा राष्ट्रीय महामार्ग असो या सर्व परिसरात खड्यांची अवस्था एकसारखीच आढळत असल्याचे अहिरे यांनी सांगितले.

खड्यांच्या संख्येत अजून वाढ 
शहरात मागील महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील सर्वच भागांत खड्डे बघायला मिळत होते. महापालिकडून हे खड्डे बुजविण्याठी मुरुमाचा वापर करण्यात येतो मात्र अशाच ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढत आहे. तसेच पुन्हा शहरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असल्यामुळे खड्यांच्या संख्येत अजून वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देवुन कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. जेणेकरुन अशा ठिकाणी अपघात होणार नाही.

Web Title: Sad..In Nashik 14000 pits in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.