आलिशान ‘इनोव्हा’मधून सागाची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 01:36 AM2021-08-09T01:36:40+5:302021-08-09T01:37:33+5:30

महाराष्ट्र - गुजरातचा सीमावर्ती भाग असलेल्या नाशिक पूर्व वनविभागाच्या उंबरठाण वनपरिक्षेत्रातून जाणाऱ्या चोरट्यामार्गेने गुजरातच्या लाकूड तस्करांकडून चक्क एका राखाडी रंगाच्या इनोव्हा कारमधून सागाची चोरटी वाहतूक केली जात होती. वन गस्तीपथकाला माहिती मिळताच पथकाने सापळा रचून तस्करीचा डाव उधळून लावला.

Saga smuggling from the luxurious Innova | आलिशान ‘इनोव्हा’मधून सागाची तस्करी

आलिशान ‘इनोव्हा’मधून सागाची तस्करी

googlenewsNext
ठळक मुद्देउंबरठाण वनपरिक्षेत्र : वन गस्ती पथकाने सापळा लावून रोखली वाहतूक

नाशिक : महाराष्ट्र - गुजरातचा सीमावर्ती भाग असलेल्या नाशिक पूर्व वनविभागाच्या उंबरठाण वनपरिक्षेत्रातून जाणाऱ्या चोरट्यामार्गेने गुजरातच्या लाकूड तस्करांकडून चक्क एका राखाडी रंगाच्या इनोव्हा कारमधून सागाची चोरटी वाहतूक केली जात होती. वन गस्तीपथकाला माहिती मिळताच पथकाने सापळा रचून तस्करीचा डाव उधळून लावला.

नाशिक जिल्ह्यातील पेठ, हरसूल, सुरगाणा, उंबरठाण, बाऱ्हे या वनपरिक्षेत्रांची हद्द अत्यंत संवेदनशील आहे. या भागातील साग, खैरासारख्या मौल्यवान वृक्षसंपदेवर सातत्याने गुजरातस्थित तस्करांकडून इलेक्ट्रिक करवत काही स्थानिकांच्या मदतीने चालविली जाते. उंबरठाण वनपरिक्षेत्रातील म्हैसखडक या गावाच्या शिवारातून चक्क एका इनोव्हामध्ये सागाचे मोठे लाकूड टाकून तस्करी केली जात असल्याची गोपनीय माहिती वनक्षेत्रपाल संदीप जोपळे यांना मिळाली. त्यांनी पथकाला सोबत घेत सापळा रचून इनोव्हा (जीजे १५ सीबी ६५१९) कार शिताफीने रोखली. यावेळी तस्करांना वन गस्तीपथकाची कुणकुण लागल्याने जंगलाचा फायदा घेत त्यांनी मोटार उभी करून पळ काढला.

या वाहनाच्या मागावर सुरगाणा वनपरिक्षेत्र कार्यालयाचे पथकदेखील होते; मात्र उंबरठाण वनगस्ती पथकाने बाफळून गावाजवळ संशयित इनोव्हा कार रोखण्यास यश मिळविले. पथकाने कारची झडती घेतली असता मागील बाजूने सीट खाली करून घेत सागाचा मोठा बुंधा टाकलेला आढळून आला. वनविभागाच्या पथकाने कार सागासह जप्त करून तत्काळ वणी येथील वनविभागाच्या आगारात हलविली.

--इन्फो--

 

उंबरठाण वनपथक गुजरातमध्ये

 

सागाची अवैध वाहतुकीसाठी वापरलेल्या इनोव्हा कारच्या गुजरात प्रादेशिक परिवहन नोंदणी क्रमांकावरून उंबरठाण वनपरिक्षेत्र कार्यालयाचे गस्ती पथक गुजरातमध्ये जाऊन धडकले आहे. कारचा मालक व कार कोणाच्या ताब्यात देण्यात आली होती त्या संशयित इसमांचा शोध घेण्याबाबत पथक गुजरात राज्यातील सीमावर्ती भागाला लागून असलेल्या गावांसह शहरात पोहोचले आहे.

Web Title: Saga smuggling from the luxurious Innova

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.