मराठा परीट मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी सगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 10:59 PM2018-06-26T22:59:52+5:302018-06-26T23:00:56+5:30
सिन्नर : मराठा परीट समाज सेवा मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठल शंकर सगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सगर यांना नियुक्तिचे पत्र देण्यात आले.
सिन्नर : मराठा परीट समाज सेवा मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठल शंकर सगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सगर यांना नियुक्तिचे पत्र देण्यात आले.
येथील संत गोरोबा काका मंदिरात शहर व तालुक्यातील समाजबांधवांची बैठक संपन्न झाली. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत समाजातील रूढी-परंपरा, समाजाची आर्थिक, सामाजिक व राजकीय परिस्थिती याबाबत चर्चा करण्यात आली. समाजाच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असणाऱ्या मागण्यांसाठी संघटित लढ्याची गरज असल्याचे राऊत यांनी सांगितले. मराठा परीट सेवा मंडळाच्या माध्यमातून राज्यातील समाजबांधवांचे प्रभावी संघटन करण्यात येत असून, नाशिक जिल्ह्याची जबाबदारी सगर यांच्याकडे देण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली.
मंडळाचे सचिव विलास जोर्वेकर, बाळासाहेब वाडेकर, योगेश सगर, रमेश बोराडे, दत्ता देसाई, बंडू जाधव, शांताराम जमधडे, संजय चौधरी आदींच्या उपस्थितीत सगर यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. जिल्हा स्तरावर मेळावा घेऊन लवकरच जिल्हा व तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती जोर्वेकर यांनी दिली. यावेळी भगवान जाधव, चंद्रकांत देसाई, बाजीराव आंबेकर, माजी नगरसेवक भाऊशेठ जाधव, संजय आंबेकर, सुनील निकम, किशोर जाधव, किसन वाडेकर, सचिन सगर, मनोज जाधव, निवृत्ती सगर, दशरथ देसाई आदींसह तालुक्यातील परीट समाजबांधव उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सगर यांचा सत्कार करण्यात आला.