दृष्टीबाधीत सागरने केले २१ वेळा कळसुबाई शिखर सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 02:59 PM2019-11-08T14:59:22+5:302019-11-08T15:07:58+5:30
दृष्टी बाधित सागर बोडके आपल्या अपंगत्वाचे भांडवल न करता आत्मविश्वासाने एम. ए. चे शिक्षण घेत असून त्याने २१ वेळा कळसुबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर सर करून जागतिक विक्रम केला आहे
नाशिक : आज समाजात अनेक धड धाकड तरुण नैराश्यामुळे आत्मविश्वास गमावून बसतात. कधी कधी तर टोकाची भूमिका घेत आत्महत्या सुद्धा करतात. अशा वेळी दृष्टी बाधित सागर बोडके आपल्या अपंगत्वाचे भांडवल न करता आत्मविश्वासाने एम. ए. चे शिक्षण घेत असून तसेच विविद सामाजिक उपक्र मात सहभागी होत आहे .
सागर सायकलिंग, बुद्धिबळ, गिरी भ्रमंती, अथेलेटीक्स सारख्या क्र ीडा क्षेत्रात अव्वल कामगिरी करत आहे .तसेच त्याने २१ वेळा कळसुबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर सर करून जागतिक विक्रम केला आहे. त्याचे जीवन अनेकांना प्रेरणादाई असे आहे. यासाठी सागरला ‘ब्रावो आंतरराष्टीय फ्रांस’ आवृतीने जागतिक विक्र माचे प्रमाणपत्र प्रदान केले. हे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या हस्ते सागरने स्वीकार केले. याप्रसंगी गरुडझेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष व जागतिक विक्रम वीर डॉ. संदीप भानोसे उपस्थित होते.