‘त्यांच्या’ अंत्यसंस्कारासाठी तरु णच बनले सगेसोयरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 10:30 PM2020-06-01T22:30:48+5:302020-06-02T00:56:53+5:30

नाशिक : एखादी व्यक्ती मरण पावली की, तिच्या अंत्यसंस्कारात सर्वजण सहभागी होतात. आता मात्र कोरोनाने सर्व परिस्थितीच बदलून टाकली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कारासाठी काही वेळा तर जवळचे नातेवाईकदेखील पुढे येत नाहीत, मात्र अशा कठीणप्रसंगी जनकल्याण समितीचे दहा तरु ण जणू काही त्या मृत व्यक्तीचे सगेसोयरे बनवून अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडत आहेत.

Sagesoyre became the young man for 'his' funeral | ‘त्यांच्या’ अंत्यसंस्कारासाठी तरु णच बनले सगेसोयरे

‘त्यांच्या’ अंत्यसंस्कारासाठी तरु णच बनले सगेसोयरे

Next

नाशिक : (मुकुंद बाविस्कर ) एखादी व्यक्ती मरण पावली की, तिच्या अंत्यसंस्कारात सर्वजण सहभागी होतात. आता मात्र कोरोनाने सर्व परिस्थितीच बदलून टाकली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कारासाठी काही वेळा तर जवळचे नातेवाईकदेखील पुढे येत नाहीत, मात्र अशा कठीणप्रसंगी जनकल्याण समितीचे दहा तरु ण जणू काही त्या मृत व्यक्तीचे सगेसोयरे बनवून अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडत आहेत.
कितीही वैर असो, मरणदारी आणि तोरणदारी हजेरी लावावी, असे म्हटले जाते. म्हणजे एखादे शुभकार्य किंवा अंत्यसंस्कारासारख्या दु:खाच्या प्रसंगी कोणताही राग मनात न ठेवता जाण्याची प्रथा भारतीय संस्कृतीत आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर परिवारातील सदस्य व नातेवाईक मंडळी कोठेही असो निरोप आला की, लगेच तत्काळ अंत्यसंस्कारासाठी जातात. पण सध्याच्या कोरोनाच्या काळात जशी सेवाभावी वृत्तीने काम करणारी माणसं दिसतात. तसेच एखाद्या मृत माणसाच्या सावलीलादेखील उभी राहणारी माणसेदेखील समाजात दिसून येतात. काळ मोठा कठीण आला आहे असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय अनेक वेळा येत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू पावल्यांचे अंत्यसंस्कार कसे करायचे? त्यांच्याजवळ गेले तर आपल्यालाही कोरोना होईल की काय? मृत्यू पावलेल्याला गावाकडे घेऊन गेले तर त्यांच्या अंत्यविधीला ग्रामस्थ विरोध तर करणार नाहीत? अशा अनेक यक्षप्रश्नांमुळे काहीवेळा कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह जणू काही ‘बेवारस’ होत असतो. मात्र एकप्रकारे या बेवारस ठरलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी मनात कोणतीही भीती न बाळगता सेवाभावी वृत्तीने काही युवक करीत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने जनकल्याण समितीच्या माध्यमातून त्यांचे हे कार्य सुरू आहे. आतापर्यंत जिल्हा
रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पाच व्यक्तींचे अंत्यसंस्कार करण्याचे कार्य या तरुणांनी पार पाडले आहेत. यात मंदार ओलतीकर, मनोज कुलकर्णी, स्वप्नील जोशी, जयेश क्षेमकल्याणी, अजय गोटखिंडीकर, अद्वैत देशपांडे आदी
तरु ण कार्यकर्त्यांचा सहभाग आहे.
विशेष म्हणजे या कार्यासाठी या तरुणांनी आपल्या कुटुंबाचीदेखील परवानगी घेतली असून, त्यांचादेखील या सेवाभावी कार्याला पाठिंबा आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सेवाभावी कार्यात त्यांनी जिवाची पर्वा न
करता स्वत:ला वाहून घेतले आहे. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याचे राष्ट्रीय संघ आणि जनकल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे.
-------------------------
जिल्हा रु ग्णालयाकडून सहकार्य
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांनी कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी घेतली असून, त्यांनी जिल्हा रु ग्णालयातून अत्यावश्यक सुविधा देण्यात येत आहेत. अंत्यसंस्कार सहभागी झालेले हे तरु ण पीपीई कीट, मास्क, गॉगल्स आदींचा वापर करून नियमानुसार सर्व कर्तव्य पार पाडीत आहेत. याकामी त्यांना अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. जेजूरकर यांचे सहकार्य लाभत आहे, अशी माहिती जनकल्याण समितीचे मंगेश खाडीलकर यांनी दिली.

Web Title: Sagesoyre became the young man for 'his' funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक