सहस्रदीप प्रज्वलन सोहळा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:12 AM2020-12-25T04:12:52+5:302020-12-25T04:12:52+5:30
कोरोनामुळे व महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंतच्या संचारबंदीमुळे सहस्रदीप प्रज्वलन सोहळा साजरा करता येणार ...
कोरोनामुळे व महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंतच्या संचारबंदीमुळे सहस्रदीप प्रज्वलन सोहळा साजरा करता येणार नाही. पंचम गुरुपीठाधीश श्री स्वामी सखा सुमंत सरस्वती यांच्या उपस्थितीत १८ वर्षांपासून नववर्षाच्या पूर्वसंध्येला नाशिककर अभूतपूर्व सोहळ्यात सहभागी होतात. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षी नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र यंदा कोरोनाने देशभरात थैमान घातले असल्याने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून दीपप्रज्वलन सोहळा रद्द करण्याचा निर्णय स्वामी मित्र मेळा प्रतिष्ठान आणि शिवनेरी युवक मित्रमंडळाने घेतला आहे. कोरोनाविरुध्द लढ्यासाठी व कोरोनायोध्दांना सद्भावना व्यक्त करण्यासाठी आपल्या घराबाहेर गॅलरीत घराच्या गच्चीवर रात्री १२ वाजता दीपप्रज्वलित करून सहत्रदीप सोहळ्याची परंपरा अखंड चालू ठेवत नववर्ष कोरोनामुक्ती आरोग्यदायी ठरण्याची प्रार्थना करावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.