मखमलाबाद विद्यालयात सहविचार सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:11 AM2021-07-23T04:11:09+5:302021-07-23T04:11:09+5:30
नाशिक: डाळिंबाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना पिकावरील तेल्या रोगामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये डाळिंब पिकावर ...
नाशिक: डाळिंबाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना पिकावरील तेल्या रोगामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा प्रार्दुभाव झाल्यामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. पिके वाचविण्यासाठी औषध फवारणीवर शेतकऱ्यांना खर्च करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
पावसामुळे पिकांना मिळाली संजीवनी
नाशिक: सुमारे दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. मध्यंतरी पाऊस नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागात शेती कामांना पुन्हा वेग आला आहे. संततधारेमुळे भात लागवडीची लगबग वाढली आहे.
गाड्यांना विलंब झाल्याने गैरसोय
नाशिक: मुंबईहून नाशिकला येणाऱ्या गाड्यांना विलंब झाल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची गैरसोय झाली. जवळपास सहा ते आठ तास गाड्यांना विलंब होत असल्याने अनेकांना प्रवासाचा बेतही रद्द करावा लागला. पावसामुळे कसारा, इगतपुरीत गाड्या अडकून पडल्याने गाड्या विलंबाने धावत होत्या.
कॅम्पला शाळा सुरू झाल्याने तक्रार
नाशिक: कोरोना पूर्णपणे संपलेला नसतानाही देवळाली कॅम्प परिसरातील काही शाळा सुरू झाल्या असल्याचे याप्रकरणी पालकांनी शिक्षण खात्याकडे तक्रार केली असल्याचे समजते. कॅम्प परिसरात असलेल्या काही कॉन्व्हेंट स्कूल सुरू झाल्या असून, मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांना आग्रह केला जात आहे. शाळेत न आल्यास परीक्षेला बसू न देण्याचा इशारा दिला जात असल्याने पालक संतप्त झाले आहेत.
विजेची उपकरणे बंद ठेवण्याचे आवाहन
नाशिक: पावसाळ्यात आकाशात चमकणाऱ्या विजांच्या काळात नागरिकांनी विजेची कोणतीही कामे करू नये, तसेच विजेची उपकरणे अशा परिस्थितीत शक्यतो बंद ठेवावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसाळ्यात वीज पडून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.