एरंडगाव येथे ‘सही पोषण -देश रोशन’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 08:15 PM2020-10-08T20:15:43+5:302020-10-09T01:09:53+5:30
एरंडगाव : पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना व ग्रामपंचायत एरंडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सही पोषण -देश रोशन अभियान कार्यक्रम संपन्न झाला.
एरंडगाव : पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना व ग्रामपंचायत एरंडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सही पोषण -देश रोशन अभियान कार्यक्रम संपन्न झाला.
अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती प्रविण गायकवाड होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्या कमलताई आहेर, पंचायत समिती सदस्या कविताताई आठशेरे, अनिताताई काळे, सरपंच मंदाकिनी पडोळ, कृऊबा संचालक नवनाथ काळे, विस्तार अधिकारी अनिल जºहाड आदी उपस्थित होते महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे, कॅल्शीयमचे प्रमाण कमी असल्याचे वेगवेगळ्या पाहणीतून पुढे आले आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्याव. शुध्द व सकस आहार घ्यावा. कुटुंबा बरोबर स्वत:ची ही काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्रतीपादन सभापती गायकवाड यांनी यावेळी बोलतांना केले. कार्यक्रमात कुपोषित बालक व गरोदर माता यांच्या पोषण आहार बाबत विविध पद्धतीने मांडणी करून माहिती देण्यात आली. तत्पूर्वी उपस्थित सर्व अंगणवाडी कार्यकर्ती यांनी गावातून घोषणा देत जनजागृतीपर फेरी काढली होती. सही पोषण -देश रोशन अभियानात कुपोषण निर्मूलन, स्री भ्रूण हत्या याबाबत जयश्री खकाळे व रुपाली उंडे यांची जनजागृतीपर भाषणे झाली. यावेळी पोषण आहारासाठी घरगुती उपलब्ध साहित्य व वस्तू पासून तयार सकस आहाराची प्रात्यक्षिक मांडणी करण्यात आली होती. तर रांगोळी द्वारे ही सुंदर रेखाटन करून याबाबत जागृती करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते बेबी किटचे वाटप करण्यात आले. पदोन्नतीने अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून निवड झालेल्या अलका ठाकरे व शेळके यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमास कचरू उराडे, भास्कर पडोळ, अण्णासाहेब जोंधळे, प्रशांत पाटील, दिलीप मोरे, सोमनाथ भालनुर, अशोक उराडे, योगेश उराडे, भिमाजी मोरे, ज्ञानेश्वर खकाले, बबन घोरपडे, चंद्रभान मोरे, पिंटू मोरे, कोंडिराम मोरे, तुळशीराम मढवई, कविता पडोळ, रुक्सार पटेल, सुवर्णा चव्हाण, सुनीता खापरे, छाया गोसावी, पयर्वेक्षिका अहिरराव, भालेराव, शिंपी उपस्थित होते.प्रास्ताविक पयर्वेक्षिका अहिरराव यांनी केले. सूत्रसंचालन ग्रामसेवक देवचंद शिंदे यांनी केले.