साहित्य परिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:37 AM2018-07-23T00:37:46+5:302018-07-23T00:38:04+5:30
प्रतिभावंत साहित्यिकांना प्रोत्साहित करताना रसिकांना दर्जेदार साहित्याची मेजवानी मिळावी, असा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेचा प्रयत्न असून, यावर्षभरात किमान २४ कार्यक्र म घेण्याचा शाखेचा मानस असल्याचे शाखेच्या चौथ्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी सांगितले.
नाशिकरोड : प्रतिभावंत साहित्यिकांना प्रोत्साहित करताना रसिकांना दर्जेदार साहित्याची मेजवानी मिळावी, असा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेचा प्रयत्न असून, यावर्षभरात किमान २४ कार्यक्र म घेण्याचा शाखेचा मानस असल्याचे शाखेच्या चौथ्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी सांगितले. चेहेडी येथील म्हस्के लान्स येथे रविवारी (दि.२२) ही सभा झाली. प्रारंभी सुरेखा गणोरे यांनी स्वागत काव्य सादर केले. त्यानंतर संस्थेचे कार्यवाह रवींद्र मालुंजकर यांनी सन २०१७-१८चे कार्यवृत्त सादर केले. शाखेच्या कार्यक्र मात आणखी विविधता आणावी, अशी सूचना रमेश औटे यांनी केली. वर्षभरात किमान एक-दोन कायक्रम निधी संकलनासाठी करावेत, असे मत निवृत्ती अरिंगळे यांनी व्यक्त केले. सुदाम सातभाई यांनी ताळेबंद व उत्पन्न-खर्चपत्रक सादर केले. सनदी लेखापाल गोकुळ गांगुर्डे यांची २०१८-१९ साठी फेरिनयुक्ती करावी, अशी सूचना उन्मेष गायधनी यांनी मांडली. पांडुरंग गायधनी, विष्णू गायखे, संगीता पाटील, रमेश साळवे, दामोदर मानकर, वर्षा देशमुख, मुकुंद आढाव आदींनीही चर्चेत भाग घेत शाखेच्या कार्यशैलित सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. शाखेने दिवाळी अंक काढावा, असे पुंजाजी मालुंजकर म्हणाले. शिवाजी म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद पवार यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा प्रतिनिधी नितीन ठाकरे, प्रतापदादा सोनोवणे, दशरथ लोखंडे, कामिनी तनपुरे, प्रशांत केंदळे, सुनील बोराडे, शेखर भालेराव, जयंत गायधनी, पुंजाभाऊ सांगळे, पंडित आवारे, संजय करंजकर, संजय भालेराव, राहुल बोराडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.