साहित्य संमेलन खर्चाच्या हिशेब तपासणीचे आव्हान स्वीकारले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:12 AM2021-06-28T04:12:01+5:302021-06-28T04:12:01+5:30

नाशिक : साहित्य संमेलनाच्या आयोजन प्रक्रियेत झालेल्या खर्चातील कागदपत्रांच्या सत्यतेबाबत आक्षेप घेत सावाना आणि लोकहितवादी मंडळाचे सदस्य श्रीकांत बेणी ...

Sahitya Sammelan accepted the challenge of auditing the expenses! | साहित्य संमेलन खर्चाच्या हिशेब तपासणीचे आव्हान स्वीकारले !

साहित्य संमेलन खर्चाच्या हिशेब तपासणीचे आव्हान स्वीकारले !

Next

नाशिक : साहित्य संमेलनाच्या आयोजन प्रक्रियेत झालेल्या खर्चातील कागदपत्रांच्या सत्यतेबाबत आक्षेप घेत सावाना आणि लोकहितवादी मंडळाचे सदस्य श्रीकांत बेणी यांनी साहित्य संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांना हिशेब तपासणीसाठी २९ जूनपर्यंत कागदपत्रे द्यावीत, अन्यथा १ जुलैला संमेलन कार्यालयात येऊन हिशेब तपासणार असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. आव्हान स्वीकारल्याच्या या पत्राने संमेलनाच्या निधी संकलन आणि वापरावरून पडलेल्या ठिणगीचा भडका उडण्याचीच चिन्हे दिसू लागली आहेत.

बेणी यांनी पत्रातून दिलेल्या या इशाऱ्याने साहित्य संमेलनाच्या आयोजन प्रक्रियेतील खर्चाचा वाद धुमसू लागला आहे. बेणी यांनी जातेगावकर यांना पाठवलेल्या पत्रात अनेकांप्रमाणे माझ्या मनातही साहित्य संमेलन आयोजन पद्धतीबाबत शंका असून, त्यांचे समाधान आयोजकांकडून केले जात नसल्यानेच मी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांना पत्र पाठवून त्यात लक्ष घालण्याची विनंती केली होती. माझ्या २२ मार्चच्या पत्राला पाटील यांनी माझ्या आक्षेपांचे निराकरण करण्याबाबतचे पत्र १२ एप्रिलला जातेगावकरांना पाठवून त्याची प्रत मला पाठवली होती. मात्र, तेव्हापासून २७ जूनपर्यंत संमेलनाचे निमंत्रक जातेगावकर यांच्याकडून त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर बेणी यांनी जातेगावकरांकडे संमेलनाशी संबंधित विविध कागदपत्रांची मागणी केली आहे. तसेच त्या कागदपत्रांसाठी लागणारा झेरॉक्सचा खर्चदेखील उचलण्याची तयारी दर्शवली आहे.

इन्फो

ही कागदपत्रे सादर करण्याची मागणी

जातेगावकर यांनी २९ जूनपर्यंत विविध कागदपत्रे सादर करण्याची मागणी बेणी यांनी केली आहे. लोकहितवादी मंडळाच्या धर्मादाय नोंदणीकृत संस्थेची विद्यमान घटना, २०१६ पासून २१ पर्यंत सनदी लेखापालांनी तपासलेली हिशेबपत्रके, सनदी लेखा परीक्षणाचा अहवाल, आयकर विभागाकडे सादर केलेली हिशेब पत्रके, ही हिशेब पत्रके ज्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आली, त्या सभांच्या इतिवृत्तांच्या प्रती, लोकहितवादी मंडळाने अथवा साहित्य संमेलन आयोजन समितीचे आयकर विभागाकडील पॅन कार्ड, १२ ए, ८० जी ही प्रमाणपत्रे, जीएसटी नोंदणी क्रमांक मिळण्यासाठी केलेल्या अर्जाच्या प्रती आणि या अर्जानुसार मिळालेल्या नोंदणी प्रमाणपत्रांच्या प्रती यासह अन्य विविध कागदपत्रांच्या प्रती बेणी यांनी मागितल्या आहेत. जर ही कागदपत्रे २९ जूनपर्यंत न मिळाल्यास सर्व कागदपत्रे आणि हिशेब तपासणीसाठी १ जुलैला सायंकाळी ५ वाजता संमेलनाच्या कार्यालयात येणार असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

कोट

साहित्य संमेलनाशी निगडित कागदपत्रे आणि हिशेब संमेलनाच्या कार्यालयातच आहेत. त्यामुळे ती दाखवण्यास मी केव्हाही तयार आहे. संमेलनासाठी आतापर्यंत कोणताही शासकीय निधी वापरलेला नसून सर्व वैयक्तिक खर्चातून केले आहे. दरम्यान, संमेलनाचे आयोजन अनिश्चित काळासाठी पुढे गेल्याने स्टॉलधारकांनी पैसे परत मागितल्याने त्यांना पैसे परत देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जयप्रकाश जातेगावकर, अध्यक्ष, लोकहितवादी मंडळ

Web Title: Sahitya Sammelan accepted the challenge of auditing the expenses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.