डंपरच्या धडकेने साई भक्त ठार

By admin | Published: January 31, 2015 12:47 AM2015-01-31T00:47:36+5:302015-01-31T00:47:51+5:30

शिंदे शिवारातील घटना : अन्य गंभीर जखमी

Sai devotees killed by the dump | डंपरच्या धडकेने साई भक्त ठार

डंपरच्या धडकेने साई भक्त ठार

Next

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे शिवारात दुपारी विश्रांतीसाठी थांबलेल्या भक्तांना नाश्ता घेऊन आलेल्या साई भक्तांच्या दुचाकीला पाठीमागून डंपरने जोरदार धडक दिल्याने साईभक्त ठार झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
गुजरात वापी येथून काही दिवसांपूर्वीच पालखी घेऊन निघाले. २५-३० साईभक्त पंचवटीत गुरुवारी रात्री मुक्काम केला. शुक्रवारी सकाळी नाशिकरोड मार्गे शिर्डीला जाण्यासाठी निघालेली साईभक्तांची पालखी शिंदे गाव शिवारातील कामाक्षी ट्रान्सपोर्टजवळ विश्रांती व नाश्ता करण्यासाठी थांबली. साईभक्तांना रमेशभाई प्रतापभाई हडपती (४३), संजयभाई मंगुभाई हडपती (२०) रा. बगोद नवीननगरी, बलसाड हे दोघेजण पल्सर दुचाकी(जीजे १५ एएस १८८८) हिच्यावर नाश्ता घेऊन आले. नाश्ता करून साईभक्त पालखी घेऊन सिन्नरच्या दिशेने निघाले. तर पालखीच्या पाठीमागून पल्सर दुचाकीवर निघालेल्या रमेशभाई व संजयभाई यांना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या डंपरने जोरदार धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित रुग्णवाहिकेतून उपचाराकरिता रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रस्त्यातच युवा साईभक्त संजयभाई हडपती यांचे निधन झाले. अपघातानंतर डंपरचालक पळून गेला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातामुळे प्रचंड हळहळ करत अत्यंत दु:खी मनाने साईभक्त माघारी परतले. (प्रतिनिधी)

Web Title: Sai devotees killed by the dump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.