साई पालखीचे जायगावहून शिर्डीकडे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 02:49 PM2020-01-13T14:49:04+5:302020-01-13T14:49:15+5:30
नायगाव -जायगाव येथील साई श्रध्दा आयोजित जायगाव ते शिर्डी पायी दिंडी पालखीचे सोमवारी सकाळी शिर्डीकडे प्रस्थान झाले.
नायगाव -जायगाव येथील साई श्रध्दा आयोजित जायगाव ते शिर्डी पायी दिंडी पालखीचे सोमवारी सकाळी शिर्डीकडे प्रस्थान झाले. दिघोळे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष चंद्रकांत बोडके यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
सोमवारी सकाळी हनुमान मंदिर प्रांगणात सजविलेल्या पालखीत सार्इंच्या प्रतिमेचे बोडके व पोलीस पाटील भिकाजी गिते यांच्या हस्ते पुजन करून महाआरती घेऊन पायी दिंडीने शिर्डीकडे प्रस्थान ठेवले. यावेळी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे,माजी सरपंच कैलास गिते,नामदेव दिघोळे,सुकदेव गिते,अर्जुन दिघोळे,कैलास दौंड,भारतीय सैनिक भास्कर काकड,बाजीराव दिघोळे, दिंडीचा पिहला मुक्काम वावी येथिल साई संस्था तर दुसरा मुक्काम शिर्डी येथिल संस्थानात होणार आहे.मकर संक्र ातीच्या दिवशी सकाळी दर्शन घेऊन पालखी परतीच्या मार्गाला लागेल. दरम्यान सकाळी सरपंच नलिनी विलास गिते यांनी दिंडीतील सहभागी भक्तांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली होती.सुर्योदय पतसंस्थेचे संचालक चंद्रकांत बोडके यांनी पायी चालणाऱ्या भाविकांसाठी टी-शर्ट व पाण्याची व्यवस्था केली आहे.साई श्रध्दा ग्रूपच्या वतीने भाविकांच्या सामानासाठी व मुक्कामातील जेवण व नाश्त्याची व्यवस्था पोलीस कर्मचारी अनिल दिघोळे,अंबादास केदार व ग्रुपच्या वतीने केली आहे. दरवर्षाप्रमाणे यावर्षीच्या अकराव्या पालखी पदयात्रेत परिसरातील तरु ण साईभक्तांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदवला आहे.पदयात्रा यशस्वीतेसाठी दशरथ गिते,शरद गामणे,सतिष सानप,विकास दिघोळे,अरु ण गिते,सुयोग दिघोळे आदीसह ग्रामस्थ प्रयत्नशील आहे.