साईबाबा पालखी शिर्डीला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 11:46 PM2019-12-13T23:46:29+5:302019-12-14T00:49:01+5:30
दत्तचौक येथील साईसेवक मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही शिर्डी येथे साई पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होेत. सार्इंच्या पालखीच पूजन नगरसेवक राजेंद्र महाले यांच्या हस्ते करून पालकीला सुरुवात करण्यात आली.
सिडको : दत्तचौक येथील साईसेवक मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही शिर्डी येथे साई पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होेत. सार्इंच्या पालखीच पूजन नगरसेवक राजेंद्र महाले यांच्या हस्ते करून पालकीला सुरुवात करण्यात आली.
दत्तचौक येथील साई सेवक मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय अहिरे, जितेंद्र जाधव, विवेक पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दरवर्षी सिडकोतील दत्तचौक ते शिर्डी येथे साईबाबांची पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात
येते.
यंदाचे तेरावे वर्ष असून, यावर्षी मोठ्या प्रमाणात या पायी पालखी सोहळ्यात साईभक्तांनी सहभाग घेतला असल्याचे दिसून आले.
पालखीचे स्वागत
सिडकोतील दत्तचौक येथून साईभक्तपालखी घेऊन पायी शिर्डी येथे प्रस्थान करतात. या दरम्यान ठिकठिकाणी साई पालखीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी होत असते. यादरम्यान साईभक्तांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येते.
४शुक्रवारी सकाळी साईबाबांची भव्यमूर्ती तसेच पादुकांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक दत्तचौक, हनुमान चौक, प्रताप चौक, वीर सावरकर चौक, शॉपिंग सेंटर, लेखानगर, डीजीपी, नाशिकरोडमार्गे काढण्यात आली. मिरवणुकीत ढोल-ताशा व सांस्कृतिक वाद्यच्या माध्यमातून मिरवणूक शिर्डी येथे प्रस्थान झाली. सिन्नर तसेच वावी पांगरी याठिकाणी मुक्काम करून पालखीचे शिर्डी येथे प्रस्थान केले जाणार असल्याचे संजय अहिरे यांनी सांगितले.