साईबाबा मंदिरात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 23:09 IST2018-12-09T23:08:29+5:302018-12-09T23:09:24+5:30

पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे अज्ञात चोरट्यांनी साईबाबा मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील सुमारे वीस हजार रुपयांची रोकड लंपास केली. तसेच ग्रामदैवत श्री संत हरिबाबा मंदिरातीलही दानपेटी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. यामुळे पांगरी परिसरात खळबळ उडाली आहे.

Saibaba stole in the temple | साईबाबा मंदिरात चोरी

पांगरी येथे अज्ञात चोरट्यांनी साईबाबा मंदिरातील फोडण्यात आलेली दानपेटी. 

ठळक मुद्देपांगरी : दानपेटी फोडून वीस हजार रुपयांची रोकड लंपास

पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे अज्ञात चोरट्यांनी साईबाबा मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील सुमारे वीस हजार रुपयांची रोकड लंपास केली. तसेच ग्रामदैवत श्री संत हरिबाबा मंदिरातीलही दानपेटी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. यामुळे पांगरी परिसरात खळबळ उडाली आहे.
शनिवारी (दि. ८) रात्रीच्या सुमारास येथील साईबाबा मंदिरातील दाराचा कोयंड्याचे स्क्रू खोलून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश
केला. मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून सुमारे वीस हजार रुपयांची रोकड घेऊन मंदिराच्या दाराच्या कोयंड्याचे स्क्रू पुन्हा लावून देत तेथून पोबारा केला. त्यानंतर चोरट्यांनी येथून जवळच असलेल्या श्री संत हरिबाबा मंदिराकडे मोर्चा वळविला. या मंदिराच्या शटर्सचे कुलूप तोडून कट्टरच्या साहाय्याने दानपेटीचे कुलूप कापण्याचा प्रयत्न केला. परंतु मंदिरासमोरील रस्त्यावर असलेल्या हॉटेलचालकाच्या चोर चोरी करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर चोरट्यांनी तेथून पोबारा केला. पहाटेच्या वेळी साईबाबा मंदिरात आरतीसाठी आलेले बजरंग धुमाळ, श्याम बैरागी, शांताराम वारूळे यांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर त्यांना मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात आले. रविवारी सकाळी याबाबत वारूळे यांनी वावी पोलिसांना चोरी झाल्याची माहिती कळविली. त्यानंतर पोलीस हवालदार संदीप शिंदे व दशरथ मोरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यापूर्वी दोनदा चोरीयापूर्वी श्री संत हरिबाबा मंदिरात दोनवेळा चोरी झाली होती, दुसºया वेळी चोरट्यांनी दानपेटीच उचलून नेली होती. त्यामुळे यावेळी दानपेटी चांगल्या प्रकारे पॅक करण्यात आली असल्याने चोरांना त्यातील रोकड चोरता आली नाही.

Web Title: Saibaba stole in the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.