सायखेड्याच्या विद्युत अभियंत्यास तीन तास डांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2022 01:04 AM2022-02-25T01:04:25+5:302022-02-25T01:05:10+5:30

कोणतीही पूर्वसूचना न देता गोदाकाठमध्ये वीज वितरण कंपनीने ट्रान्सफॉर्मर बंद केल्याने गुरुवारी (दि. २४) शेतकऱ्यांचा उद्रेक झाला. करंजगावचे माजी सरपंच व महाराष्ट्र राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके-पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत सर्वपक्षीय शेतकऱ्यांसमवेत सायखेडा कार्यालयात धडक मारली व टाळे ठोकत सहायक अभियंता मनोज कातकाडे यांना तीन तास कार्यालयात डांबले.

Saikheda's electrical engineer was beaten for three hours | सायखेड्याच्या विद्युत अभियंत्यास तीन तास डांबले

सायखेड्याच्या विद्युत अभियंत्यास तीन तास डांबले

googlenewsNext
ठळक मुद्देकार्यालयास टाळे : सायखेड्याच्या शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

सायखेडा : कोणतीही पूर्वसूचना न देता गोदाकाठमध्ये वीज वितरण कंपनीने ट्रान्सफॉर्मर बंद केल्याने गुरुवारी (दि. २४) शेतकऱ्यांचा उद्रेक झाला. करंजगावचे माजी सरपंच व महाराष्ट्र राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके-पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत सर्वपक्षीय शेतकऱ्यांसमवेत सायखेडा कार्यालयात धडक मारली व टाळे ठोकत सहायक अभियंता मनोज कातकाडे यांना तीन तास कार्यालयात डांबले.

शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन करत तेथेच ठिय्या मांडला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुमतीने कातकाडे यांनी चालू देयके भरून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले. गोदाकाठच्या करंजगाव, शिंगवे, चापडगाव, बेरवाडी, चाटोरी, तारुखेडले, म्हाळसाकोरे, भेंडाळी, महाजनपूर, तळवाडे आदी गावांतील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा थकीत वीजबिलांअभावी खंडित करण्यात आला होता. द्राक्षाला भाव नसल्याने व आधीच गोदाकाठला ऊसतोड न झाल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांचा संयमाचा बांध फुटला व त्यांनी सायखेडा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी करंजगावचे सरपंच नंदू निरभवणे, सायखेड्याचे सरपंच महेश कातकाडे, युवासेनेचे समन्वयक अनिकेत कुटे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष राम राजोळे, राष्ट्रवादीचे गटप्रमुख मंगेश पाटील राजोळे, भाजपचे दिलीप सानप, उपसरपंच शंकर राजोळे, सदस्य रावसाहेब पाटील राजोळे, नामदेवकाका पवार, रोहिदास कामडे, योगेश राजोळे, पुंजा भगुरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

इन्फो

अभियंत्याला विचारला जाब

राज्य बियाणे समितीचे सदस्य खंडू बोडके-पाटील यांनी खंडित वीजपुरवठ्याबाबत सायखेड्याचे सहाय्यक अभियंता मनोज कातकाडे यांना जाब विचारत धारेवर धरले व कार्यालयात तब्बल तीन तास त्यांना कोंडून ठेवले. कार्यकारी अभियंता डोंगरे व उपअभियंता योगेश्वर पाटील यांच्याशी खंडू बोडके पाटील यांनी दूरध्वनीवर चर्चा करत तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

कोट...

गोदाकाठचे शेतकरी संकटांनी बेजार झाले आहेत. त्यातच भर म्हणून वीज कंपनीने सक्तीची वसुली सुरू करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतात ऊस उभा असून, इतर पिकांना मातीमोल भाव असल्याने शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नये. अन्यथा यापुढे शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्यात येईल.

- खंडू बोडके-पाटील, माजी सरपंच, करंजगाव

फोटो - २४ सायखेडा एनर्जी

सायखेडा येथे वीज वितरण कंपनीचे अभियंता मनोज कातकाडे यांना कार्यालयात डांबून ठेवल्यानंतर ठिय्या मांडून बसलेले संतप्त शेतकरी.

Web Title: Saikheda's electrical engineer was beaten for three hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.